या तारखेला ​'राक्षस' येणार प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 11:20 AM2017-12-21T11:20:02+5:302017-12-21T16:50:02+5:30

'नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइन'चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा निर्मित आणि समित कक्कड यांच्या ‘समित कक्कड फिल्म्स' ...

A visit by the audience to 'Giant' on this date | या तारखेला ​'राक्षस' येणार प्रेक्षकांच्या भेटीस

या तारखेला ​'राक्षस' येणार प्रेक्षकांच्या भेटीस

googlenewsNext
'
;नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइन'चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा निर्मित आणि समित कक्कड यांच्या ‘समित कक्कड फिल्म्स' प्रस्तुत ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित 'राक्षस' असे हटके नाव असलेला मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
राक्षस या चित्रपटात प्रमुख भूमिकेत एक जबरदस्त ‘बाहुबली’ आवाज असलेला अभिनेता आपल्या भेटीला येणार आहे. ज्याने संग्राम ही खलनायकाची ‘लय भारी’ भूमिका साकारत तमाम मराठी रसिकांची मने जिंकली होती तो अभिनेता म्हणजे शरद केळकर. प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर आणि शरद केळकर अशी नवीन, फ्रेश जोडी प्रेक्षकांना ‘राक्षस’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. शरद केळकर अविनाश ही व्यक्तिरेखा यामध्ये साकारत असून तो एक डॉक्यूमेंट्री मेकर आहे, त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना ‘राक्षस’ मध्ये पाहायला मिळणार आहे.
‘राक्षस’बद्दल बोलताना शरद केळकर म्हणाला की, या चित्रपटाची कथा ऐकली त्याक्षणी मला वाटले की, आपण या चित्रपटाचा भाग व्हावे, माझ्यासाठी अतिशय आव्हानात्मक अशी ही भूमिका होती. प्रेक्षकांना आणि माझ्या चाहत्यांना हा रहस्यपट नक्की आवडेल असा मला विश्वास आहे.
‘राक्षस’ असा शब्द उच्चारला तरी अंगावर शहारे आल्याशिवाय राहात नाहीत. राक्षसाची विविध रूपे आजपर्यंत आपण गोष्टींमध्ये ऐकलेली आहेत. आदिवासी पाड्यांवर लहानपण गेलेल्या ज्ञानेश झोटींग यांचे 'राक्षस'चे लेखन अनुभव सिद्ध असून त्यांनी त्यांचे लहानपणचे अनुभव चित्रपटाच्या कथेत अतिशय सुंदरपणे गुंफले आहेत.
ऋजुता देशपांडे, दयाशंकर पांड्ये, विजय मौर्य, याकूब सैद, पूर्णानंद वांदेकर, उमेश जगताप, विठ्ठल काळे, पंकज साठे, अनुया कळसकर, अनिल कांबळे, मकरंद साठे, जयेश संघवी, सविता प्रभुणे, साक्षी व्यवहारे, अभिजित झुंझारराव, सोमनाथ लिंबारकर इत्यादी कलाकारांच्या सुंदर अभिनयाने वेगळ्या आशयाच्या या चित्रपटाला योग्य तो न्याय दिला आहे.
दरम्यान या चित्रपटाच्या पहिल्या प्रभावी पोस्टरमुळे चित्रपटाविषयी उत्कंठा वाढली असून, शरद केळकरचा वेगळा लुक असलेल्या या नव्या पोस्टरमुळे ती अजून ताणली गेली आहे. या ‘राक्षस’ मध्ये नेमकं काय गुढ दडले आहे याची उकल येत्या २३ फेब्रुवारी २०१८ रोजी होणार आहे.

Also Read : ​फेमिनामध्ये सई ताम्हणकरचा जलवा,व्हाईट गाऊनमध्ये दिसली ग्लॅमरस

Web Title: A visit by the audience to 'Giant' on this date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.