भय चित्रपटाच्या टिमची लोकमत कार्यालयाला भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2016 06:55 PM2016-12-04T18:55:03+5:302016-12-04T18:55:03+5:30
भय चित्रपटाच्या टिमने नुकतीच लोकमत कार्यालयाला भेट दिली. यावेळी चित्रपटाच्या संपूर्ण टिमने या सिनेमाविषयी अनेक गोष्टींचा उलगडा केला. अभिजीत ...
भ चित्रपटाच्या टिमने नुकतीच लोकमत कार्यालयाला भेट दिली. यावेळी चित्रपटाच्या संपूर्ण टिमने या सिनेमाविषयी अनेक गोष्टींचा उलगडा केला. अभिजीत खांडकेकर, स्मिता गोंदकर, विनीत शर्मा, सिदधार्थ बोडके दिग्दर्शक राहूल भातनकर, लेखक नितिन सुपेकर, हे सर्व कलाकार उपस्थित होते. यावेळी अभिजीतने त्याच्या भूमिकेविषयी सांगितले. अभिजित सांगतो, गोकुळ जोशी नावाची व्यकितरेखा मी यामध्ये साकारतोय. सिझोफ्रेनिया या आजाराने ग्रासलेला हा माणूस असतो. मी अशाप्रकारच्या भूमिका कॉलेजमधील एकांकिकांमध्ये केल्या आहेत. ही स्टोरीच मला अतिशय इंटरेस्टींग वाटली. मला वाटले एक अभिनेता म्हणून स्वत:ला सिदध करण्यासाठी चांगली संधी असल्याने मी ही भूमिका स्वीकारली. तर स्मिता सांगते, मला खरतर अभिजीतची भूमिका फारच आवडली होती. त्याच्या भूमिकेला अनोखे पदर आहेत. माझी व्यक्तीरेखा देखील मस्त आहे. मीरा नावाच्या मुलीची भूमिका मी साकारली आहे. मीरा ही गोकुळची पत्नी असते. तिला समजत असते की माझ्या नवºयाला असा आजार आहे पण त्याला यातून बाहेर कसा काढायचा या दुविधेमध्ये ती अडकलेली असते. ती अतिशय सशक्त असते परंतू या परिस्थितीत ती गोकुळला कशी साथ देते हे पाहणे मनोरंजक असणार आहे. दिग्दर्शक राहूल या चित्रपटाबद्दल बोलताना सांगतात की, कथा अतिशय चांगली असल्याने मी यामध्ये अजिबातच काही एडीटींग केले नाही. या कथेचा स्क्रिनप्लेच एवढा फास्ट होता की सुरुवाती पासूनच प्रेक्षकांना तो बांधून ठेवतो. आता पुढे काय होईल याची उत्सुकता अगदी पहिल्या सीन पासूनच सुरु होते. प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणार हा सिनेमा आहे. विनीत शर्मा सांगतात, माझी यातील भूमिका एका गुंडाची आहे. मी चेंबुरमध्ये अनेक गुंडांना जवळून पाहिले आहे. यामध्ये मी साकारणारी भूमिका देखील एकदमच वेगळी आहे. खर सांगायच झाला तर भाई होण्यामध्ये पण एक ग्लॅमर आहे. आणि म्हणूनच ती लोकं अगदी ग्लॅमरसाठी भाईगिरी करतात. आपण दुसºयाला मारण्यासाठी सुपारी घेतली तर आपण देखील कधीतरी मारले जाऊ या भीतीमध्ये हे गुंड जगत असतात. मी काही अशाप्रकारचीच भूमिका यामध्ये साकारत आहे.