​‘विठ्ठला शप्पथ’ १५ सप्टेंबरला चित्रपटगृहात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2017 09:55 AM2017-09-09T09:55:37+5:302017-09-09T15:25:37+5:30

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठूरायाची महती आजवर अनेक मराठी चित्रपटांतून दाखविण्यात आली आहे. असे असले तरीही प्रेक्षक नेहमीच ...

'Vitthal Shapath' on 15th September at the theater | ​‘विठ्ठला शप्पथ’ १५ सप्टेंबरला चित्रपटगृहात

​‘विठ्ठला शप्पथ’ १५ सप्टेंबरला चित्रपटगृहात

googlenewsNext
ाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठूरायाची महती आजवर अनेक मराठी चित्रपटांतून दाखविण्यात आली आहे. असे असले तरीही प्रेक्षक नेहमीच सावळ्या विठुरायावर आधारित असणाऱ्या चित्रपटांच्या प्रतीक्षेत असतात. प्रेक्षकांची हीच आवड लक्षात घेऊन गुरुदर्शन फिल्म्स आणि पहेल प्रोडक्शन एल.एल.पी यांनी ‘विठ्ठला शप्पथ’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या १५  सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. वारीतील ऊर्जा आणि सकारात्मक भावना हे सगळंच अलौकिक असून भक्तांची देवभेटीची ओढ विलक्षण प्रामाणिक असते. ‘विठ्ठला शप्पथ’ चित्रपटाच्या निमित्ताने विठ्ठल भेटीचा ध्यास आणि आस याची अनुभूती पुन्हा एदका घेता येणार आहे. या चित्रपटातून विठ्ठलाचे त्याच्या भक्ताशी असलेले भावनिक नाते अधोरेखित करण्यात आले आहे.
एका वडील आणि मुलाच्या नात्याच्या माध्यमातून ‘विठ्ठला शप्पथ’ची कथा उलगडते. वडिलांच्या विठ्ठलभक्ती विरोधात असणारा कृष्णा त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे बदलतो का? याची रोमहर्षक कथा या चित्रपटातून पाहायला मिळेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत पवार यांनी केले आहे. ‘विठ्ठला शप्पथ’ या चित्रपटाची कथा, पटकथा चंद्रकांत पवार यांची असून संवाद लेखन चंद्रकांत पवार, कौस्तुभ सावरकर, भानुदास पानमंद यांचे आहेत. प्रत्येक देवभक्ताला या चित्रपटाच्या निमित्ताने भक्तीचा अनोखा अनुभव मिळेल असा विश्वास दिग्दर्शक चंद्रकांत पवार यांनी व्यक्त केला.
वेगवेगळ्या जॉनरची चार गीते यात असून राहुल देशपांडे, स्वप्निल बांदोडकर, आनंदी जोशी, आदर्श शिंदे, प्रवीण कुँवर या गायकांच्या आवाजात ती स्वरबद्ध करण्यात आली आहेत. मंगेश कांगणे, क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना चिनार-महेश या मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याच्या आघाडीच्या संगीतकार जोडीने संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे.   
मंगेश देसाई, अनुराधा राज्याध्यक्ष, उदय सबनीस, विद्याधर जोशी, संजय खापरे, अंशुमन विचारे, विजय निकम, केतन पवार, प्रणव रावराणे, राजेश भोसले या कलाकारांसोबत विजय साईराज, कृतिका गायकवाड ही नवोदित जोडी या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव तर कलादिग्दर्शन वासू पाटील यांचे आहे.

Also Read : प्रेक्षकांवर मोहिनी घालणार का विजय-कृतिकाची जोडी?

Web Title: 'Vitthal Shapath' on 15th September at the theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.