‘आम्ही दोघी’चा टीझर प्रदर्शित,मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट अगदी वेगळ्या भूमिकेत रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 11:29 AM2018-01-08T11:29:16+5:302018-01-08T16:59:16+5:30

नावाप्रमानेच ही दोघींची कथा....त्यांच्या वाटा वेगळ्या पण मार्ग एकच... विचार वेगळे पण आवड एकच...त्या वेगळ्या,पण तरीही एकच.... ही कथा ...

We display two teasers' teasers, Mukta Barve and Priya Bapat in a different role. | ‘आम्ही दोघी’चा टीझर प्रदर्शित,मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट अगदी वेगळ्या भूमिकेत रसिकांच्या भेटीला

‘आम्ही दोघी’चा टीझर प्रदर्शित,मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट अगदी वेगळ्या भूमिकेत रसिकांच्या भेटीला

googlenewsNext
वाप्रमानेच ही दोघींची कथा....त्यांच्या वाटा वेगळ्या पण मार्ग एकच... विचार वेगळे पण आवड एकच...त्या वेगळ्या,पण तरीही एकच.... ही कथा आहे अमला आणि सावित्री सरदेसाई या दोघींची. ‘आम्ही दोघीं'मधील दोघींची.येत्या १६ फेब्रुवारी रोजी रसिकांसमोर येणार आहे. पहिल्या टीझरमधून ती रसिकांच्या भेटीला संक्षिप्त पद्धतीने आली आहे आणि ती पाहताना त्यातील वेगळेपणही अधोरेखित होतो. त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे.या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातील सावित्री म्हणजे प्रिया बापट तीन वेगवेगळ्या रुपांत आपल्याला भेटणार आहेत. तीन वेगळ्या वयोगटांतील तिची ही रूपे मोहक आहेत. “एकदा वाटलं ना कि करून टाकायचं, मग हाळहळ वाटत नाही,” असे ती अमला म्हणजे (मुक्ता बर्वे ) हिला सांगते. टीजरमधून समोर येणाऱ्या वाक्यातून  तिचे व्यक्तिमत्व उलगडत जाते. अमलाचे व्यक्तिमत्वही तिच्या दोन-चार छटांमधून समोर येते, आणि हा चित्रपट ‘हट के’ आहे, ही बाब मनोमन पटते.चित्रपट आणि रंगभूमीवरील आपल्या कसदार अभिनयाने आपले वेगळे असे स्थान निर्माण केलेल्या मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांच्या या आगामी मराठी चित्रपटात वेगळ्या भूमिका आहेत. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे सादरीकरण आणि निर्मिती असलेला हा चित्रपट १६ फेब्रुवारी २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. अभिनेत्री, कॉस्चुम डीझायनर व सह-दिग्दर्शक म्हणून चित्रपट रसिकांना माहित असलेल्या प्रतिमा जोशी यांचे दिग्दर्शनीय पदार्पण ‘आम्ही दोघी’मधून होत आहे.

 

“मुक्ता आणि प्रिया या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या आणि नावाजलेल्या कलाकार आहेत. दोघींनीही वैविध्यपूर्ण भूमिका करत स्वतःला सिद्ध केले आहे.त्यांच्या तशाच वेगळ्या भूमिका असेलेला हा चित्रपट म्हणजे रसिकांसाठी एक मेजवानीच असणार आहे. मराठी रसिक म्हणूनच या चित्रपटाची वाट आतुरतेने पाहत आहेत,” असे उद्गार एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या संजय छाब्रिया यांनी काढले.“आम्ही दोघी’ ही आजच्या तरूणींच्या नातेसंबंधाची गोष्ट आहे. यात आई-मुलगी, मैत्रिणी, बाप–मुलगी, प्रियकर-प्रेयसी अशा नात्यांना स्पर्श केला गेला आहे. प्रत्येक व्यक्तीने फक्त स्वतःच्या दृष्टीकोनातून विचार न करता समोरच्याचा दृष्टीकोनही ध्यानात घेतला पाहिजे हि बाब या चित्रपटात अधोरेखीत होते. त्यामुळेच ती आजच्या प्रत्येक तरुणीला आपली गोष्ट वाटेल व त्यांच्या  संवेदनशिलतेला स्पर्श करून काही गोष्टीचा विचार करायला भाग पाडेल,”असे उद्गार दिग्दर्शक प्रतीमा जोशी यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना काढले.

 

मुक्ता बर्वे ही आजची मराठी चीत्रपटसृष्टीतील आघाडीची कलाकार आहे. तिने आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांबरोबरच टीव्ही मालिका आणि नाटकांमध्येही वैविध्यपूर्ण भूमिका केल्या आहेत व त्यासाठी तिला पुरस्कार ही मिळाले आहेत. ‘जोगवा’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाच्या भूमिकेसाठी तिचे कौतुक झाले. प्रिया बापट हिने मराठी चित्रपटांबरोबरच हिंदीमध्येही अनेक महत्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. ‘काकस्पर्श’ या चित्रपटाने तर तिला सर्वदूर प्रसिद्धी मिळवून दिली.प्रतिमा जोशी यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या तब्बल १० चित्रपटांमध्ये सह-दिग्दर्शक म्हणून जबाबदारी पारी पाडली आहे.‘आम्ही दोघी’ या चित्रपटाचे पटकथा आणि सवांद भाग्यश्री जाधव यांनी केले आहे. निर्मिती आणि सादरीकरणाची जबाबदारी स्वीकारलेल्या एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट ने आत्तापर्यंत अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली असून त्यांमध्ये मी 'शिवाजीराजे भोसले बोलतोय','तुकाराम','आजचा दिवस माझा','हॅप्पी जर्नी','टाईम प्लीज','मुंबई-पुणे-मुंबई 2','बापजन्म' आणि २०१८ रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'मुंबई-पुणे-मुंबई 3' या चित्रपटांचा समावेश आहे.

 

Web Title: We display two teasers' teasers, Mukta Barve and Priya Bapat in a different role.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.