​अम्ही जातो आमुच्या गांवा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2016 05:14 PM2016-02-23T17:14:01+5:302016-02-23T10:16:29+5:30

सध्या ‘बाबांची शाळा’ या आगामी मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. कैद्याच्यी जीवनावार आधारित हा चित्रपट आहे. त्या पार्श्वभूमिवर ...

We go to Amu's village | ​अम्ही जातो आमुच्या गांवा

​अम्ही जातो आमुच्या गांवा

googlenewsNext
्या ‘बाबांची शाळा’ या आगामी मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. कैद्याच्यी जीवनावार आधारित हा चित्रपट आहे.

त्या पार्श्वभूमिवर ‘आम्ही जातो आमुच्या गांवा’ या चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कमलाकर तोरणे दिग्दर्शित ‘आम्ही जातो आमुच्या गांवा’ या चित्रपटात माणुसकीचे उत्कृष्ट चित्रण करण्यात आले आहे.

तीन कैदी जेव्हा जेलमधून फरार होऊन एका सज्जन माणसाच्या घरी आश्रय घेतात. हा सज्जन गृहस्थ त्यांची प्रेमाने आणि आस्थेने आदरतिथ्य करतो. दोन प्रेमळ शब्द न ऐकण्याच्या सवयीमुळे कैद्यांसाठी जीवन बदलणारा अनुभव ठरतो.

amhi jato

सुर्यकांत, उमा, श्रीकांत मोघे, गणेश सोळंकी, दत्ता भट, विजू खोटे यांसारख्या एक से बढकर एक कलाकारांनी चित्रपटात काम केले आहे.

मधुसुदन काळेकर यांच्या लेखणीतून चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद साकारलेले आहेत. जगदीश खेबुडकर आणि वंदना विटणकर यांच्या शब्दांना सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केले होते. चित्रपटातील ‘देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा’ हे भजनगीत आजही प्रसिद्ध आहेत.

हिंदीमध्ये या चित्रपटाचा ‘तीन चोर’ नावाने रिमेक बनला होता. विनोद मेहरा आणि झहिराने यामध्ये काम केले होते. मात्र, प्रेक्षकांनी तो नाकारला.

Web Title: We go to Amu's village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.