'आम्हाला २ दिवस कोंडून ठेवलं आणि…'; 'बलोच'च्या निर्मात्यानं सांगितला शूटिंगदरम्यानचा 'तो' अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 04:45 PM2023-05-05T16:45:54+5:302023-05-05T16:46:21+5:30

गेल्या काही दिवसांपासून प्रवीण तरडें(Pravin Tarde)च्या 'बलोच' (Baloch Movie) चित्रपटाची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. पानिपत चित्रपटाच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची कथा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर दाखविण्यात येणार आहे.

'We were locked up for 2 days and…'; The producer of 'Baloch' told 'that' experience during shooting | 'आम्हाला २ दिवस कोंडून ठेवलं आणि…'; 'बलोच'च्या निर्मात्यानं सांगितला शूटिंगदरम्यानचा 'तो' अनुभव

'आम्हाला २ दिवस कोंडून ठेवलं आणि…'; 'बलोच'च्या निर्मात्यानं सांगितला शूटिंगदरम्यानचा 'तो' अनुभव

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून प्रवीण तरडें(Pravin Tarde)च्या 'बलोच' (Baloch Movie) चित्रपटाची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. पानिपत चित्रपटाच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची कथा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटात प्रवीण तरडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाचे शूटिंग करणे हा या टीमसाठी थरारक अनुभव होता. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला एका खोलीत गावकऱ्यांनी डांबून ठेवले होते, असा खुलासा या चित्रपटाचा सहनिर्माता आणि अभिनेता अमोल कांगणे(Amol Kangane)ने केला.

बलोच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत अमोल कांगणेने या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आलेल्या अडचणीबद्दल सांगितले. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काही कारणास्तव गावकरी त्यांच्यावर नाराज झाले आणि या संपूर्ण टीमला एका बंद खोलीत त्यांनी दोन दिवस डांबून ठेवले होते, असा खुलासा त्याने केला आहे.

त्यांनी आम्हाला कोंडून ठेवले

अमोल कांगणे म्हणाला की, जैसलमेरमध्ये आम्ही राहायला होतो. जैसलमेरपासून ६०ते ७० किलोमीटर पुढे पाकिस्तान बॉर्डरवर खुर्जी म्हणून गाव आहे तिथे आम्ही शूटिंग करत होतो. चार-पाच दिवस आमचे शूटिंग सुरू होते. प्रवीण सर तिथले शूटिंग संपायच्या एक दिवस आधीच मुंबईला गेले आणि दुसऱ्या दिवशी माझे, स्मिता मॅमचे आणि अशोक समर्थ सरांचे शूटिंग होते. ते शूटिंग सुरू असताना आमची टीम आणि तेथील स्थानिक प्रोडक्शन यांच्यात काही कारणामुळे वाद झाले. त्यांना आमचा इतका राग आला की त्यांनी आम्हाला तिथे कोंडून ठेवले.

२ कोटींची केली मागणी

पुढे तो म्हणाला की, ते इतके रागावले होते की ते आम्हाला म्हणाले, ‘शूटिंग थांबवा आणि इथून निघा.’ आम्हाला अक्षरशः त्यांनी तिथे दोन दिवस कोंडून ठेवले. शेवटी आम्ही पुण्याच्या पोलिस कमिशनरांना फोन केला आणि त्यांना सगळे सांगितले. नंतर त्या पोलिस कमिशनरांनी जैसलमेरमधील कमिशनरांना फोन केला. त्यानंतर त्या गावकऱ्यांनी आमच्याकडे २ कोटींची मागणी केली. पैसे दिले नाहीत तर इथून शूटिंग करून जायचे नाही, असे त्यांनी आम्हाला सांगितले. एका तांत्रिक गडबडीमुळे त्यांच्या मनात आमच्याबद्दल गैरसमज निर्माण झाला आणि तो वाढत गेला. त्या दोन दिवसांमध्ये त्या गावकऱ्यांनी आमच्या गाड्यांच्या टायरची हवा काढली होती. अखेर त्यांनी मला, स्मिता मॅमला आणि अशोक समर्थ सरांना आम्ही प्रमुख कलाकार असल्यामुळे गाडी दिली आणि तिथून निघण्याची परवानगी दिली. पण बाकी आमची संपूर्ण टीम मागे राहिली होती. त्या गावकऱ्यांनी टीमला जेवायलाही दिले नाही. अखेर आमचे निर्माते आणि पोलीस यांनी मिळून गावकऱ्यांची समजूत काढली आणि त्यांना ६० लाख रुपये देऊन हे प्रकरण मिटवले.

Web Title: 'We were locked up for 2 days and…'; The producer of 'Baloch' told 'that' experience during shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.