वाट दाखवी आम्हा,गौरीनंदना...हे गजानना,प्राजक्ताची गजाननाला साद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 09:28 AM2018-03-27T09:28:59+5:302018-03-27T14:58:59+5:30

चित्रपट... एक असं माध्यम ज्याने आयुष्य खूप सोपं होऊन जातं.बऱ्याचदा आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हेच माध्यम आपल्या कामी येतं. ...

We will show you, Gaurinandana ... Hey Gajanana, Prajakta ka Gajanala Saad | वाट दाखवी आम्हा,गौरीनंदना...हे गजानना,प्राजक्ताची गजाननाला साद

वाट दाखवी आम्हा,गौरीनंदना...हे गजानना,प्राजक्ताची गजाननाला साद

googlenewsNext
त्रपट... एक असं माध्यम ज्याने आयुष्य खूप सोपं होऊन जातं.बऱ्याचदा आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हेच माध्यम आपल्या कामी येतं. आयुष्यात पदोपदी त्या विघ्नहर्त्याला साद घालणाऱ्या भाविकांसाठी रणांगण चित्रपटाचं नवं गाणं नुकतंच लाँच झालं आहे.या गाण्यात प्राजक्ता माळी गजाननाला साद घालताना दिसते आहे. तर सचिन पिळगांवकर,सुचित्रा बांदेकर, स्वप्नील जोशी, सिध्दार्थ चांदेकर,प्रणाली घोगरे या गणरायासमोर नतमस्तक आहेत.गणेशभक्तांच्या भावना व्यक्त करणारे शब्द लिहिले आहेत गुरू ठाकूर यांनी तर शशांक पोवार यांनी संगीत दिलं आहे. वैशाली माडेच्या आवाजात नटलेलं हे गाणं गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केलं आहे.आपल्या हक्कांची लढाई लढण्यासाठी सज्ज झालेल्या युवकाची कथा 52 विक्स एंटरटेनमेंट आणि ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स) आणि हार्वे फिल्म्स यांनी मांडली असून या चित्रपटाची निर्मिती करिष्मा जैन आणि जो राजन यांनी केली आहे.अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी आणि कार्तिक निशानदार यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन राकेश सारंग यांनी केलं आहे.नात्यांना लागलेला सुरूंग हा विघ्नहर्ता कसा सोडवतो हे चित्रपट पाहिल्यावर कळेलंच.


नेहमीच गोड भूमिकांमधून आपल्यासमोर आलेल्या स्वप्नील जोशीचा एक वेगळा लूक नुकताच लाँच झाला.'रणांगण' चित्रपटाच्यानिमित्ताने हा मराठी सिनेसृष्टीचा नायक आता खल-नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.या चित्रपटातून रणांगणात सुरू असलेलं एक वेगळंच युध्द प्रेक्षकांसमोर येणार आहे.आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूकीत बरेच नवे दावपेच खेळले जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. या निवडणूकांत काहीही करून मतं आपल्या खात्यात करण्यासाठी पक्षांमध्ये चुरस रंगली आहे.अशातच प्रसिध्दीच्या शिखरावर असणारे कैक चेहरे येऊ घातलेल्या निवडणुकीचा भाग होण्याचं चित्र नाकारता येत नाही.त्यातच सचिन पिळगांवकरांचा राजकारणी लूक बाहेर आला आणि या ‘अभि’नेत्यांच्या यादीत अजून एक नाव जोडलं जातंय की काय.अशी पाल कित्येकांच्या मनात चुकचुकली.मात्र असं काहीही नसून आगामी ‘रणांगण’ चित्रपटात सचिन पिळगांवकर राजकारण्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Web Title: We will show you, Gaurinandana ... Hey Gajanana, Prajakta ka Gajanala Saad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.