आलोक करणार वेबसीरीज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2016 02:15 PM2016-11-05T14:15:28+5:302016-11-05T14:15:28+5:30
सध्या मराठी वेबसीरीजची चलती आहे. एकापाठो एक वेबसीरीज पाहायला मिळत आहेत. कास्टिंग काउच, बॅक बेंचर्स, स्ट्रगलर साला, आपल्या बापाचा ...
ध्या मराठी वेबसीरीजची चलती आहे. एकापाठो एक वेबसीरीज पाहायला मिळत आहेत. कास्टिंग काउच, बॅक बेंचर्स, स्ट्रगलर साला, आपल्या बापाचा रस्ता, आपल्या बापाची सोसायटी यांच्या पावलावर पाउल टाकत आणखी एक वेबसीरीज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या वेबसीरीजचे नाव शष्प असे असणार आहे. या वेबसीरीजचे दिग्दर्शन अभिनेता आलोक राजवाडे याने केले आहे. या वेबसीरीजविषयी लोकमत सीएनएक्सला आलोक सांगतो, ही माझी पहिलीच वेबसीरीज असणार आहे. आतापर्यत खूप सारे नाटक, सिनेमे केले आहेत. त्यामुळे वेबसीरीजचा अनुभव हा खूप वेगळा असणार आहे. तसेच पहिली वेबसीरीज असल्यामुळे प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार याचा देखील अंदाज लावता येत नाही. त्याचप्रमाणे या वेबसीरीजचे सध्या बारा एपिसोडचे नियोजन केले आहेत. तसेच वेबसीरीजच्या जमान्याविषयी सांगायच तर, टीव्ही व रेडिओ हे एका काळाचे माध्यम होते. त्याचप्रमाणे वेबसीरीजदेखील एक नवीन माध्यम आहे. याला प्रेक्षक कसे स्वीकारतात हा महत्वाचा मुद्दा आहे. पण या वेबसीरीजविषयीची पसंतीदेखील आगामी काळात कळेलच. यापूर्वी आलोकने खूपसारी नाटक केली आहेत. तसेच तो रमामाधव या चित्रपटातदेखील पाहायला मिळाला होता. पण आलोकची ही नवीन इनिंग त्याच्या चाहत्यासाठी नक्कीच आनंददायी गोष्ट असणार आहे.