लहान मुलांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा चित्रपट 'वेल डन बॉईज'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 09:36 PM2021-06-29T21:36:31+5:302021-06-29T21:37:00+5:30

लहान मुलांच्या जीवनावर 'वेलडन बॉईज' या चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे.

'Well Done Boys', a film about children's lives | लहान मुलांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा चित्रपट 'वेल डन बॉईज'

लहान मुलांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा चित्रपट 'वेल डन बॉईज'

googlenewsNext

'रमाबाई आंबेडकर','आम्ही चमकते तारे', व 'श्यामची शाळा' या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर साईनाथ चित्र यांची निर्मिती असलेला 'वेल डन बॉईज' या नव्याकोऱ्या चित्रपटाचे चित्रीकरण व  तांत्रिक गोष्टी पूर्ण झाल्याची माहिती दिग्दर्शक प्रकाश आत्माराम जाधव यांनी दिली.  
   
 लहान मुले ही देशाची भविष्य असतात. परंतु आज आपण या मुलांचे आचरण,संस्कार,भाषाशैली आणि वागण्या बोलण्याची पद्धत पाहिली तर असे वाटते,की देशाचे भविष्य अंधकारमय तर नाही ना? प्रत्येक शाळेत जसे हुशार विद्यार्थी असतात तसेच खोडकर,उनाड व मस्तीखोर विद्यार्थीही असतात. परंतु या मुलांमध्येही कुठेतरी चांगले गुण दडलेले असतात. या मस्तीखोर मुलांचे अंधकारमय भविष्य शिक्षकांमार्फत कसे प्रकाशमय करता येईल असा एक प्रयत्न या चित्रपटातून केलेला आहे. चित्रपटातील आशिष निनगुरकर व अशोक मानकर लिखित गाण्यांना  श्रीरंग आरस व एस.पी.सेन यांनी संगीत दिले असून पल्लवी केळकर,श्यामल सावके,गीता व जे.पी दत्ता यांनी ही गाणी गायली आहेत.


            
लहान मुलांच्या जीवनावर या चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. प्रकाश जाधव यांचे याअगोदरचे सिनेमे देखील लहान मुलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारे होते. 'वेलडन बॉईज' या चित्रपटाचे लेखन अशोक बाफना व किशोर ठाकूर यांचे असून अशोक मानकर व महेंद्र पाटील यांनी संवाद लिहिले आहेत.गीतलेखन आशिष निनगुरकर व अशोक मानकर यांनी केले असून  चित्रपटाचे छायांकन त्रिलोकी चौधरी,हितेश बेलडर व प्रकाश कारलेकर यांचे असून संकलन- दिग्दर्शन प्रकाश  आत्माराम जाधव यांचे आहे. या चित्रपटात मोहन जोशी,विजय पाटकर,शिल्पा प्रभूलकर,प्रिय रंजन,विनोद जॉली,महेंद्र पाटील व आशिष निनगुरकर यांच्याबरोबर अनेक बालकलाकारांनी यात भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे चित्रीकरण व तांत्रिक गोष्टी पूर्ण झाले असून लवकरच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Web Title: 'Well Done Boys', a film about children's lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.