सध्या काय करतेय 'अगडबम' चित्रपटातील नाजुका?, खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 07:00 AM2021-10-17T07:00:00+5:302021-10-17T07:00:00+5:30

२०१० साली अगडबम चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटातील नाजुकाने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते.

What are you doing right now? The delicate movie 'Agadbam' is very glamorous in real life | सध्या काय करतेय 'अगडबम' चित्रपटातील नाजुका?, खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस

सध्या काय करतेय 'अगडबम' चित्रपटातील नाजुका?, खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस

googlenewsNext

२०१० साली अगडबम चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटातील नाजुकाने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. या चित्रपटात मकरंद अनासपुरे, तृप्ती भोईर, उषा नाडकर्णी आणि चित्रा नवाथे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात नाजुकाची भूमिका अभिनेत्री तृप्ती भोईर हिने साकारली आहे. या चित्रपटातून नाजुकाच्या भूमिकेतून तृप्ती घराघरात पोहचली. शेवटची ती २०१८ साली रिलीज झालेल्या माझा अगडबम या चित्रपटात पहायला मिळाली. 


अभिनेत्री तृप्ती भोईर ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्मातीदेखील आहे. चित्रपट, मालिका, नाटक या तिन्ही क्षेत्रात तृप्तीने मेहनतीने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे’, ‘अगडबम’, ‘हॅलो जय हिंद’, ‘टुरिंग टॉकिज’ अशा अनेक चित्रपट तृप्तीने दिग्दर्शित केले आहेत. या चित्रपटात तृप्तीला खूप चांगले यश मिळाले.

मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन कल्पना अंमलात आणणाऱ्या तृप्तीने ‘टुरिंग टॉकीज’, ‘हॅलो जय हिंद’, ‘अगडबम’, ‘तुझ्या माझ्या संसाराला अजून काय हवं’ या चित्रपटांमध्ये अभिनयदेखील केला. ‘चार दिवस सासूचे’, ‘वादळवाट’ या मालिकांमध्ये आणि ‘इंद्राक्षी’, ‘सही रे सही’ या नाटकांमध्येही तिने काम केले आहे.

 
तृप्ती भोईरने २०१७ साली दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील संगीतकार टी सतीश चक्रवर्थी यांच्यासोबत लग्नबेडीत अडकली आहे. तिचा विवाह चेन्नईमध्ये संपन्न झाला. तृप्ती भोईर सोशल मीडियावर सक्रीय असून फोटो शेअर करत असते.

Web Title: What are you doing right now? The delicate movie 'Agadbam' is very glamorous in real life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.