महात्मा गांधीजींचा 'तो' आश्रम आणि कच्चा लिंबू सिनेमाचं काय आहे कनेक्शन ?जाणून घेण्यासाठी वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 05:46 AM2017-08-10T05:46:56+5:302017-08-10T11:16:56+5:30

'कच्चा लिंबू' हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातून ब-याच गोष्टी पहिल्यांदाच घडत आहेत. ब्लॅक एंड व्हाईट ...

What is the connection of Mahatma Gandhiji's 'ashram' and raw lemon film? Read on to learn | महात्मा गांधीजींचा 'तो' आश्रम आणि कच्चा लिंबू सिनेमाचं काय आहे कनेक्शन ?जाणून घेण्यासाठी वाचा

महात्मा गांधीजींचा 'तो' आश्रम आणि कच्चा लिंबू सिनेमाचं काय आहे कनेक्शन ?जाणून घेण्यासाठी वाचा

googlenewsNext
'
;कच्चा लिंबू' हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातून ब-याच गोष्टी पहिल्यांदाच घडत आहेत. ब्लॅक एंड व्हाईट किंवा कृष्णधवल सिनेमांचा काळ संपून आता बरीच वर्षे झाली आहेत.कलरफुल्ल सिनेमांचं पर्व सुरु झाल्यापासून ब्लॅक एंड व्हाईट सिनेमा मागे पडले आहेत. मात्र आता मराठी रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा ब्लॅक एंड व्हाईट युग अवतरणार आहे. कच्चा लिंबू सिनेमा ब्लॅक अँड व्हाईट रुपात रसिकांना पाहता येणार आहे. याशिवाय या सिनेमाची खास बात म्हणजे सिनेमाचा लेखक चिन्मय मांडलेकर. या सिनेमाची कथा चिन्मयनं कशी लिहली हे सुद्धा तितकंच खास आहे. ब-याचदा सिनेमाची कथा लिहताना लेखक एखाद्या सत्य घटनेवर ती लिहतात. कधी कधी प्रसिद्ध कादंबरीवर कथा लिहल्या जातात. मात्र 'कच्चा लिंबू' सिनेमाच्या कथेबाबत चिन्मयबाबत थोडं हटकेच घडलं आहे.चिन्मयनं कच्चा लिंबू या सिनेमाची कथा वेगवेगळ्या स्थानावर बसून लिहली आहे.विशेष म्हणजे ही कथा लिहिताना चिन्मयनं ती कथा जिथं लिहली त्या जागेचं नाव नोंद करुन ठेवलं. मात्र सिनेमाच्या शूटिंग दरम्यान एक आश्चर्यजनक बाब चिन्मयला उलगडली. कथा वाचता वाचता त्याचा बहुतांशी भाग हा साबरमती आश्रमासमोर बसून लिहला असल्याचं चिन्मयला समजलं. काही महिन्यांपूर्वी तो एका सिनेमाच्या शूटिंगसाठी अहमदाबादला गेला होता. त्यावेळी साबरमती आश्रमाजवळील हॉटेलमध्ये ते राहिले होते. त्याच दरम्यान चिन्मयला कच्चा लिंबू सिनेमाची कथा सुचली. कथा लिहिताना त्याच्या डोळ्यासमोर सिनेमातील काही पात्रंही डोक्यात होती. विशेषतः सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर यांचा विचार डोक्यात ठेवूनच त्यानं ही कथा लिहली. याबाबतचं गुपित खुद्द चिन्मयनं उलगडलं आहे. आता साबरमती आश्रम परिसरात सुचलेली चिन्मयची ही कथा रसिकांना भावते का ते हे पाहणं रंजक ठरेल.  

Web Title: What is the connection of Mahatma Gandhiji's 'ashram' and raw lemon film? Read on to learn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.