मानसी का म्हणतेय, काही गोष्टी सिक्रेट राहिलेल्याच बऱ्या ?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2016 03:00 PM2016-12-04T15:00:50+5:302016-12-05T17:35:54+5:30
priyanka londhe अभिनेत्री मानसी साळवीने अनेक हिंदी-मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करुन स्वत:ची वेगळी ओळख ...
priyanka londhe
अभिनेत्री मानसी साळवीने अनेक हिंदी-मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करुन स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मालिकांमधून मानसी आज घराघरात पोहोचली आहे. अनेक वर्षांनंतर ती एका मराठी चित्रपटात काम करीत आहे. मनमर्झिया या चित्रपटाच्या सेटवर मानसीने लोकमत सीएनएक्सशी मारलेल्या या मनमोकळ््या गप्पा...
मनमर्झिया हा चित्रपट स्वीकारण्याचे कारण काय?
-: चार तरुण मुलं मला भेटायला आली आणि त्यांनी सांगितलं आम्ही सिनेमा करतोय. नवीन मुलांचे विचार आणि कथा वेगळ्या असतात. पुण्यात शूटिंग असल्याने मी होकार कळवला. त्यांकडे कथा तयार होती. त्यांच्यातील आत्मविश्वास दिसतच होता. त्यांचे नियोजन चांगले असल्याने काम करायला मजा आली.
नवीन मुलांसोबत काम करताना ते चांगलं काम करतील याची भीती मनात होती का?
-: नक्कीच. या मुलांचे योग्य नियोजन आहे की नाही, याबाबत मला शंका होती. आता हे आपल्याला झाडांच्या मागे कपडे बदलायला लावणार नाहीत ना. व्हॅनिटी असेल का? जेवणाचे सेटवर हाल तर होणार नाही ना? असे असंख्य प्रश्न माझ्यासमोर होते. परंतु या मुलांचे मी खरंच कौतुक करीन की त्यांचे नियोजन अतिशय चांगले आहे.
चित्रपट-मालिका दोन्ही एकाच वेळी कसे करतेस ?
-: माझ्या मालिकेचे चित्रिकरण आता लवकरच सुरू होणार आहे. सध्या मला वेळ होता म्हणूनच मी हा चित्रपट करण्याचे ठरविले. कारण एकदा जर तुमच्या मालिकेचे शूटिंग सुरू झाले की अजिबात चित्रपटांना वेळ मिळत नाही. पूर्वी विकली डेली सोप असायचे पण आता तसे नाही. त्यामुळे वेळा जमवणे फारच कठीण असते.
तू जशी पूर्वी दिसायचीस तशीच आताही दिसतेस, तुझा फिटनेस फंडा काय आहे ?
-: मी या क्षेत्रात काम करत असल्याने मला फिटनेसकडे लक्ष देण्याची गरज आहे. अनेकजण तुम्हाला रोल मॉडेल मानत असतात. त्यामुळे तुम्ही सतत स्वत:कडे लक्ष देण्याची आवश्यकता असते. तुम्हा चांगले दिसता त्यामुळेच लोक तुमच्याकडे पाहतात. तुम्हीच जर त्यांना प्रेरणा दिली नाही तर ते तुमच्याकडे पाहतील का? आणि म्हणूनच मी स्वत:ला जास्त फीट ठेवण्याचा प्रयत्न करते, कारण ती माझी इनव्हेस्टमेंट आहे.
हिंदी रिअॅलिटी शोमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर करशील का ?
- : मी एक कलाकार आहे. मला माझ्या क्षेत्रात काम करायला नेहमीच आवडेल. पण मी रिअलमध्ये काय आहे ते फक्त माझ्या घरच्यांनाच माहितीय. मी खरी कशी आहे ते जर प्रेक्षकांना दाखवलं तर माझा सगळा पिटाराच उघडेल ना. त्यामुळे मला असे वाटते की काही गोष्टी सिक्रेट ठेवलेल्याच बºया असतात. म्हणूनच मी रिअॅलिटी शो नाही करु शकत.