स्लिम दिसण्यासाठी नेहा पेंडसेने केल्या या गोष्टी?जाणून घ्या फिटनेसचे Daily Routine
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 08:56 AM2017-12-16T08:56:15+5:302017-12-16T14:27:00+5:30
अभिनय क्षेत्रात कलाकार म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.स्वत:ला वेल मेंटेंन ठेवण्यातच कलाकारांचा जास्त कस लागत असतो. ...
अ िनय क्षेत्रात कलाकार म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.स्वत:ला वेल मेंटेंन ठेवण्यातच कलाकारांचा जास्त कस लागत असतो. मात्र कधी कधी कितीही मेहनत केली तर प्रत्येक कलाकार हा फिट असतोच असे नाही. जे शरिराने जाडजुड असतील तर अशांना या इंडस्ट्रीत काही किंमतच नाही असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.भूमिकेप्रेमाणे स्वत:चा फिटनेस मेंटेन कराण्यासाठी त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागते.अभिनेत्री आणि झीरो फिगर हे जणू गेल्या काही वर्षातलं समीकरण बनलंय.प्रत्येक अभिनेत्री झीरो फिगरला अधिकाधिक महत्व देताना दिसतात.बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्रींची उदाहरणं आहेत ज्या नेहमी स्वतःला फिट ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करत इतरांनाही व्यायाम - योगा करण्याचा सल्ला देताना दिसतात. इतकंच काय तर प्रत्येक अभिनेत्री झीरो फिगरला अधिकाधिक महत्व देताना दिसतायत.आता अशीच काहीशी झीरो फिगरची भुरळ एका मराठी अभिनेत्रीलाही पडल्याचे पाहायला मिळतंय.ती अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणीही नसून ती आहे अभिनेत्री नेहा पेंडसे. नुकतेच तिने इन्सटाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत त्यात तिचा बदललेला लूक पाहायला मिळतोय.तिने आपले वजनही कमी करत फिट पर्सनालिटी मिळवल्याचे फोटोत पाहायला मिळते आहे.मात्र नेहासाठीही इतरांप्रमाणे आपले वजन कमी करणे मोठे आव्हान होते.फिट पर्सनालिटी मिळवण्यासाठी फिटनेसचे गुपीत आहे पोल डान्स.नेहा दिवसभरात जवळपास दोन तास पोल डान्स करते त्यामुळे ती पहिल्यापेक्षा जास्त फिट पाहायला मिळत आहे.नेहा दिवसातला काही वेळ जीम आणि योगा करण्यासाठीही देते.आता नेहा पेंडसे पूर्वीपेक्षा जास्त ग्लॅमरस वाटु लागली आहे. नेहा पेंडसेला तिचे वाढत्या वजनामुळे ती मुख्य भूमिका साकारत असलेली 'मे आइ कम इन मॅडम' मालिकेत फिटनेस मेंटेन केला नाही तर मालिका सोडावी लागणार असल्याचे मालिकेच्या निर्मात्यांनी सांगितले होते.दिवसेंदिवस नेहाचे वजन वाढत असल्यामुळे ती ग्लॅमरस दिसत नसल्याचे मालिकेच्या निर्मांत्यांच म्हणणे होते.त्यामुळे केवळ वाढत्या वजनामुळेच तिला सुपरहिट मालिका सोडावी लागणार होती.भविष्यात केवळ वजनामुळे अशी परिस्थिती येवू नये म्हणून नेहा तिच्या फिटनेसवर अधिक मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.