मुक्ताचा बेस्ट सेल्फी कोणता?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2016 10:51 AM2016-12-14T10:51:46+5:302016-12-14T10:51:46+5:30

सध्या प्रत्येक व्यक्ती ही सेल्फीच्या प्रेमात पडलेली दिसत आहे. कारण जिथे जाऊ तेथे सेल्फी काढू हा जीवनाचा नित्यनियमच बनलेला ...

What is Mukta's best selfie? | मुक्ताचा बेस्ट सेल्फी कोणता?

मुक्ताचा बेस्ट सेल्फी कोणता?

googlenewsNext
्या प्रत्येक व्यक्ती ही सेल्फीच्या प्रेमात पडलेली दिसत आहे. कारण जिथे जाऊ तेथे सेल्फी काढू हा जीवनाचा नित्यनियमच बनलेला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे फोटोसेशन हे सेल्फी काढल्याशिवाय पूर्ण होत नाही. याच सेल्फीचा मोह प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिलादेखील आवरला नाही. कारण तिने  बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानसोबत एक झक्कास सेल्फी काढला आहे. हा सेल्फी तिने नुकताच सोशलमीडियावर अपलोड केला आहे. तसेच हा माझा बेस्ट सेल्फी असल्याचे तिने आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.  या सेल्फीसाठी तिने किंग खानचे आभारदेखील मानले आहे. तिच्या या सेल्फीला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळतान दिसत आहे. तसेच प्रचंड कमेंन्टसदेखील तिला मिळाले असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस यांच्या हृदयांतर या मराठी चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. या चित्रपटाचा मुहूर्त अभिनेता शाहरूख खानच्या हस्ते करण्यात आला होता. हृदयांतर या विक्रम फडणीसच्या पहिल्याच मराठी चित्रपटात अभिनेता सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे हे दोन कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच एका दाम्पत्याची त्यांच्या वैवाहिक जीवनातली वादळांशी असलेली झुंज दाखवणारा हा चित्रपट असणार आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या मुहूर्तावेळी मुक्ताने किंग खानसोबत हा सेल्फी काढण्याची संधी सोडली नसल्याचे दिसत आहे. असो, पण ज्यावेळी किंग खानसमोर असेल तर भाई एक तो सेल्फी बनता है. मुक्ताने यापूर्वी मराठी चित्रपटसृष्ट्रीला डबलसीट, मुंबई पुणे मुंबई, गणवेश, वायझेड असे अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. 


Web Title: What is Mukta's best selfie?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.