'आम्ही काय पाप केलंय...आम्हाला भीक नकोय...', अभिनेत्री मेघा घाडगेने व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 14:14 IST2021-07-29T14:13:26+5:302021-07-29T14:14:10+5:30

मायबाप सरकारला एक विनवणी करतो, राजकारण्यांचे कार्यक्रम आमच्या नाट्यगृहात करता…आणि आम्ही कलाकार मात्र आमच्या घरात शिरायचे नाही, हा कोणता कायदा. आम्हाला भीक नको, असे मेघा घाडगेने म्हटले आहे.

"What a sin we have committed ... we don't want to beg ...", actress Megha Ghadge expressed indignation | 'आम्ही काय पाप केलंय...आम्हाला भीक नकोय...', अभिनेत्री मेघा घाडगेने व्यक्त केला संताप

'आम्ही काय पाप केलंय...आम्हाला भीक नकोय...', अभिनेत्री मेघा घाडगेने व्यक्त केला संताप

कोरोनाच्या संकटामुळेमागील जवळपास दीड वर्षांपासून सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. लॉकडाऊन नंतर दिलेली शिथिलता हळूहळू व्यावसायिकांना पूर्वपदावर आणत असली तरी अजूनही लोककलावंतांची आणि रंगभूमी कलाकारांची चिंता मिटलेली नाही. रंगभूमीशी निगडित सर्वच कलाकार आणि लोक कलावंत आजही आपले काम कधी सुरू होईल, याच काळजीत आहे. आमचे काम सुरू व्हावे, नाट्यगृहे पुन्हा प्रेक्षकांनी भरून जावे, तिसरी घंटा पुन्हा कानी पडावी यासाठी सरकारकडे अनेक कलाकारांनी पाठपुरावा केला आहे. मात्र अजूनही यावर सरकारने ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता कलाकार महाराष्ट्रभर रंगकर्मी आंदोलन करणार आहेत.  

आमच्या हक्काचे व्यासपीठ जर नेतेमंडळी त्यांच्या प्रचारासाठी वापरत असतील तर आम्ही आता गप्प बसणार नाहीत, असा इशारा रंगभूमी कलाकारांनी दिला आहे. कलावंतांचे अस्तित्व टिकवून राहण्यासाठी आता हे कलाकार महाराष्ट्रभर रंगकर्मी आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला अभिनेत्री मेघा घाडगे हिने पाठिंबा दर्शवला आहे. 


मेघा घाडगे म्हणाली की, एक काळ होता, अगदीच तुटपुंज्या पाकिटावर समाधानी होणारे आम्ही…अलीकडे मायबाप रसिक प्रेक्षकांच्या तो टाळ्यांचा आवाज कानी ऐकू येत नाही. अनुभवी मार्गदर्शकाची ती पाठीवरची पडलेली थाप गेला काही काळ हरवून गेली आहे…. तिसरी घंटा ऐकायची आहे .. पण तीच घंटा आज धूळ खात पडली आहे. मायबाप सरकारला एक विनवणी करतो, राजकारण्यांचे कार्यक्रम आमच्या नाट्यगृहात करता…आणि आम्ही कलाकार मात्र आमच्या घरात शिरायचे नाही, हा कोणता कायदा. आम्हाला भीक नको , काम करायचे आहे …


ती पुढे म्हणाली की, आम्हाला आनंद तेव्हा मिळतो जेव्हा प्रेक्षक आमच्या कामाच्या मोबदल्यात टाळ्यांचा वर्षाव करतो. आम्ही सुखी तेव्हा दिसतो. जेव्हा आमच्या कामातून प्रबोधन होते,आज या महामारीच्या काळात सगळ्यांना सवलती दिल्या आहेत. गरिबांना जेवण, श्रीमंतांना वर्क फ्रॉम होम, घरकाम करणारे, माताडी कामगारांना,रिक्षा चालकांना सगळ्यांना एक आई सारखे आपण आपल्या पदराखाली जागा दिली. मग आम्ही काय पाप केले. या मातीशी आम्ही प्रामाणिक आहोत. या महाराष्ट्राची संस्कृती सातासमुद्रा पलीकडे घेऊन गेलो. तुमच्या ही कामात हक्काने आम्हाला बोलावता. मग तो प्रचारासाठी असो वा सेलिब्रिटी म्हणून…त्या तुझ्याच लेकराला विसरलास. आता तूच आमच्याशी अस वागणार तर आम्ही कोणाकडे पाहायचे. म्हणून तुला आमची आठवण करून देण्यासाठी,आमचं अस्तित्व टिकुन राहावे म्हणून, आम्ही आंदोलन करतो आहे…रंगकर्मीआंदोलन महाराष्ट्र जागर रंगकर्मींचा उदो उदो…

Web Title: "What a sin we have committed ... we don't want to beg ...", actress Megha Ghadge expressed indignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.