अमृताला काय मिळाले सरप्राईज गिफ्ट ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2016 04:56 PM2016-10-26T16:56:44+5:302016-10-26T16:59:02+5:30

दिवाळी हा सणाचा उत्सुकता प्रत्येकाला असते. या सणाची तयारी करण्यासाठी प्रत्येकजण उत्साही असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी आकाशकंदील, दिवे, किल्ले, ...

What is the surprise gift to Amruta? | अमृताला काय मिळाले सरप्राईज गिफ्ट ?

अमृताला काय मिळाले सरप्राईज गिफ्ट ?

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">दिवाळी हा सणाचा उत्सुकता प्रत्येकाला असते. या सणाची तयारी करण्यासाठी प्रत्येकजण उत्साही असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी आकाशकंदील, दिवे, किल्ले, रांगोळी काढण्याची लगबग पाहायला मिळते. त्यात दिवाळीला कोणी सरप्राईज दिले तर प्रत्येकाचा आनंद साहजिकच व्दिगुणीत होतो. असेच दिवाळी सरप्राईज प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविणारी अभिनेत्री अमृता खानविलकरला  मिळाले आहे. अमृताला पती हिमांशु मल्होत्रा याने दिवाळीची अनोखी भेट दिल्याने तिच्या दिवाळी उत्साहाला चार चाँद लागले आहेत. तिने नुकतेच पती हिमांशुने दिवाळीची अनोखी भेट दिल्याचे सोशल मीडियावर सांगितले आहे. हिमांशुने अमृतासाठी खास पणत्या बनवून गिफ्ट केले आहेत. अमृता सांगते, मला दिवाळीची तयारी करण्यासाठी फार आवडते. तसेच वेगवेगळया प्रकारचे पणत्यांवर डिझाइन करण्यास देखील फार मजा येते. त्यामुळे माझे हे दिवाळी गिफ्ट खरेच खूप छान आणि मस्त आहे. हिमांशुने बनविलेल्या खास पणत्यांचे सुंदर फोटोदेखील सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. तिचे हे सरप्राईज तिच्या चाहत्यांनादेखील फार आवडले आहे. सोशल मीडियावर या जोडीचे चाहते कौतुकदेखील करताना पाहायला मिळातायेत. काही वर्षापूर्वी अमृता आणि हिमांशुच्या जोडीने  नच बलिऐ ७ हा किताब पटकवला होता. त्यामुळे आज ही या जोडीची क्रेझ चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. अमृताने शाळा, बाजी, वेलकम जिंदगी, कटयार काळजात घुसली, नटरंग, वन वे तिकीट असे अनेक सुपरहीट चित्रपट मराठी इंडस्ट्रीला दिले आहेत. तर वाजले की बारा या गाण्यावर अमृताने संपूर्ण महाराष्ट्रालाच ठेका धरायला भाग पाडले होते. 



 

Web Title: What is the surprise gift to Amruta?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.