कोणता मराठी चित्रपट रॉकऑनवर पडला भारी ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2016 01:33 PM2016-11-14T13:33:11+5:302016-11-14T13:34:38+5:30

 मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्स मिळत नाहीत. अशी आरडाओरड आपण नेहमीच ऐकतो. फक्त सिंगल स्क्रिन थिएटरर्सवरच मराठी चित्रपटा लागतो आणि तो ...

Which Marathi film is rock on heavy? | कोणता मराठी चित्रपट रॉकऑनवर पडला भारी ?

कोणता मराठी चित्रपट रॉकऑनवर पडला भारी ?

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;"> मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्स मिळत नाहीत. अशी आरडाओरड आपण नेहमीच ऐकतो. फक्त सिंगल स्क्रिन थिएटरर्सवरच मराठी चित्रपटा लागतो आणि तो लगेच उतरतोही अशी ओरड नेहमीच असते. हिंदी चित्रपटांचे बॉक्स ऑफीसवर कलेक्शन देखील कोटींच्या घरात असल्याने मराठी चित्रपटांची पिछेहाट होते असेही बोलले जाते. परंतु नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वजनदार या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करून रॉक ऑन या हिंदी चित्रपटालाही मागे टाकले आहे. एवढेच नाही तर वजनदार चित्रपटाचे शोज मल्टीप्लेक्समध्ये वाढविण्यातदेखील आले आहेत.  रॉक ऑन चित्रपट पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या कमी असल्याने चित्रपट थियर्टरमधून काढण्यात आल्याचे पाहायला मिळतेय. 
 वजनदार या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीच चांगलीच चर्चा रंगली होती. सई आणि प्रियाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक अतिशय उत्सुक होते. परंतु दुसरीकडे रॉकऑन या हिंदी चित्रपटाचा सिक्वेलचे प्रमोशन देखील जोरदार सुरु होते. हिंदी चित्रपटासामोर मराठी चित्रपटाचा निभाव लागेल का अशी शंका देखील काही जणांच्या मनात निर्माण झाली होती. पण वजनदार चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ७० ते ८० टक्के ओपनिंग करत आपले स्थान भक्कम केले. तर रॉकऑन सारख्या बड्या स्टारकास्ट असलेल्या चित्रपटाला केवळ 30 ते 35 ओपनिंगवर समाधान मानावे लागले. 
सिटीप्राईड या मल्टीप्लेक्स चित्रपटगृहातून रॉकऑन या चित्रपटाचा शो काढून त्याठिकाणी वजनदार चित्रपटाचे शो लावण्यात आले आहेत. या चित्रपटगृहाच्या मॅनेजर सुगत थोरात यांनी वजनदारच्या वाढवलेल्या शोजबद्दल लोकमत सीएनएक्सशी संवाद साधताना सांगितले की, ''आम्ही वजनदारचे दोन शोज लावले होते. परंतु पहिल्याच दिवशी या चित्रपटाला जवळपास ७० ते ८० टक्के ओपनिंग मिळाले. तर रॉकऑन या चित्रपटाला फक्त ३० ते ३५ टक्के ओपनिंग मिळाले होते. म्हणूनच आम्ही रॉकऑनचे शो रद्द करुन वजनदारचे दोन शोज वाढवले आहेत.'' वजनदार या चित्रपटाच्या वाढवलेल्या शोजचा आम्हाला नक्कीच फायदा होईल असे दिसतेय. प्रेक्षक फक्त चांगला आशय असेल तरच चित्रपट पाहायला येतात. विकेंडला मराठी चित्रपट चांगली कमाई करतातच. तसेच हजार आणि पाचशेच्या नोटांचाही फटका या चित्रपटाला बसलेला नाही. वजनदारचे प्रेक्षक ऑनलाईन बुकिंग करतायेत. तसेच आम्ही तिकीट काऊंटरवर देखील डेबिट आणि क्रेडीट कार्ड स्वीकारण्याची सोय केली होती. त्यामुळे या गोष्टींचाही फायदा चित्रपटाला झाला असल्याचे दिसले असे ही त्या म्हणाल्या. 
   वजनदार या मराठी चित्रपटासाठी सई आणि प्रियाने प्रचंड वजन वाढवले होते. या चित्रपटाचा ट्रेलर, गाण्यांना प्रेक्षक पसंती देताना दिसतायेत. वजनदार या चित्रपटासाठी रॉकऑन सारख्या हिंदी चित्रपटाला मल्टीप्लेक्स सिनेमागृहात जागा मिळाली नसल्याने मराठी चित्रपटाचे पाऊल पढते पुढे असेच म्हणावे लागेल. 

Web Title: Which Marathi film is rock on heavy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.