कोण जिंकणार ‘ i Phone X’ ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 03:48 AM2017-12-26T03:48:27+5:302017-12-26T09:18:27+5:30

मराठी चित्रपटांना सध्या प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत आणण्यासाठी अनेक क्लृप्त्या लढवाव्या लागत आहेत. जाहिरातीवर अमाप खर्च करून सुद्धा उपयोग होत नाही ...

Who will win 'i Phone X'? | कोण जिंकणार ‘ i Phone X’ ?

कोण जिंकणार ‘ i Phone X’ ?

googlenewsNext
ाठी चित्रपटांना सध्या प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत आणण्यासाठी अनेक क्लृप्त्या लढवाव्या लागत आहेत. जाहिरातीवर अमाप खर्च करून सुद्धा उपयोग होत नाही म्हणून काहिजण भावनिक आवाहन करून तर कधी वाद ओढावून प्रसिद्धी पदरात पाडून घेतात. पण, या सगळ्यातून एक वेगळी, अनोखी आणि समर्पक कल्पना ‘चरणदास चोर’ या चित्रपटाच्या टीमने लढवली आहे. चित्रपटातील मुख्य आकर्षण असलेल्या ‘श्यामराव’ या रंगेबिरंगी ट्रंक सोबत सेल्फी अथवा फोटो काढण्याच्या स्पर्धेत विजेत्याला I Phone X जिंकण्याची नामी संधी आहे.

तर अशी आहे स्पर्धा! महाराष्ट्रातील जवळपास सर्वच मल्टीप्लेक्समध्ये चरणदास चोरच्या जाहीरात फलकाजवळ ही रंगेबिरंगी ‘श्यामराव’ ट्रंक तुम्हाला दिसेल. त्या ट्रंक सोबत तुम्ही नाटकीय पद्धतीने फोटो काढायचा. तो फोटो तुमच्या फेसबूक पेजवर #CharandasChor असा हॅशटॅग लावून अथवा Charandas Chor  चे फेसबूक पेज लाईक करून त्यावर थेट अपलोड करा. सर्वात नाटकीय पद्धतीने काढलेला आणि सर्वाधिक लाईक्स असलेल्या फोटोतून लकी ड्रॉ पद्धतीने एक फोटो निवडला जाईल. त्याला सध्याचा सर्वाधिक आधुनिक फिचर्स असलेला I Phone X हा स्मार्टफोन देऊन गौरविण्यात येईल. इतर सर्वाधिक पसंती व नाटकीय छायाचित्र पाठवलेल्या स्पर्धकांसाठी १०० सिनेमाची तिकीटे, श्यामराव ट्रंक्स आणि आकर्षक भेटवस्तू देण्यात येतील.  ३१ डिसेंबर च्या रात्री ११ वाजून ५९ मि. पर्यंत स्पर्धक फोटोज् अपलोड करता येईल. १ जानेवारी २०१८ रोजी चरणदास चोर च्या फेसबुक पेजवर लाईव्ह लकी ड्रॉ काढण्यात येईल. आणि विजेत्याची घोषणा केली जाईल. त्यात विजेत्या ठरलेल्या स्पर्धकाला पारितोषिक देण्यात येईल.

या स्पर्धेसाठी व चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जवळपास पंचवीस महाविद्यालयात श्यामराव ट्रंक घेऊन कार्यक्रम घेण्यात आले. त्यामुळे सध्या फेसबूकवर ट्रंक सोबतच्या नानाविध तऱ्हा असलेल्या छायचित्रांनी धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रातून आतापर्यंत आलेल्या हजारो छायाचित्रातून सोलापूरचा ऋषि अंधारे हा तरूण 2300 लाईक्ससह आघाडीवर आहे. तर मंडळी, त्वरा करा जवळच्या सिनेमागृहात जाऊन ‘श्यामराव’ ट्रंक सोबत फोटो काढून या अनोख्या स्पर्धेत सहभागी व्हा. चरणदास चोर हा श्याम माहेश्वरी लिखित-दिग्दर्शित मार्मिक विनोदी चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजे 29 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.


ALSO READ :  ​‘चरणदास चोर’ मधून उलगडणार जगण्याचे विविध आयाम!

Web Title: Who will win 'i Phone X'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.