संपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय 'बबन'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 04:06 AM2018-03-27T04:06:46+5:302018-03-27T09:36:46+5:30
सिनेमा सुपरहिट करण्यासाठी पडद्यावर ग्लॅमरची गरज नसते, हे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि अल्पावधीतच सुपरहिट ठरलेल्या 'बबन' या सिनेमाने सिद्ध ...
स नेमा सुपरहिट करण्यासाठी पडद्यावर ग्लॅमरची गरज नसते, हे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि अल्पावधीतच सुपरहिट ठरलेल्या 'बबन' या सिनेमाने सिद्ध करून दाखविले आहे. द फोक कॉनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तूत चित्राक्ष फिल्म्स निर्मित 'बबन' हा सिनेमा २३ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. सिनेमाचे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट 'ख्वाडा'चे दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. ग्रामीण जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमातील नायकाचा संघर्ष आणि त्याची महत्त्वाकांक्षीवृत्ती प्रेक्षकांना भावली असल्यामुळे सिनेमातील हा 'बबन' सर्वसामान्य प्रेक्षकांना आवडत आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमा 'ख्वाडा'च्या घवघवीत यशानंतर भाऊरावांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमादेखील त्याच उंचीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ख्वाडा' सिनेमाद्वारे नावारूपास आलेला रांगडा अभिनेता भाऊसाहेब शिंदेची 'बबन' मध्ये प्रमुख भूमिका असून यात तो एका वेगळ्याच भूमिकेतून लोकांसमोर आला आहे. 'ख्वाडा'मध्ये लाजरा, मितभाषी आणि स्वप्नाळू दाखवलेला भाऊराव, 'बबन' सिनेमात रोमान्स तसेच फायटिंग करताना दिसत आहे. 'ख्वाडा'चा रांगडा अभिनेता भाऊसाहेब शिंदेच्या नैसर्गिक अभिनयामुळे 'बबन'च्या व्यक्तिरेखेत जिवंतपणा आला आहे. 'शिवाय गायत्री जाधव तसेच सिनेमातील इतर कलाकारांची भूमिका देखील वाखाणण्याजोगी आहे.
अल्पावधीतच लोकांचा भरभरून प्रतिसाद लाभलेल्या 'बबन'ला मोठी मागणी मिळत असल्यामुळे महाराष्ट्रात या सिनेमाचे शोज २०० हून २४० करण्यात आले आहेत. त्यामुळे खास प्रेक्षकांसाठी महाराष्ट्राच्या सिनेमागृहात 'बबन'चे ४०० हून ५०० शोज वाढवले गेले असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईबाहेरील सिनेमागृहात 'बबन' सिनेमाच्या तिकीट खिडकीवर हाऊसफुलची पाटी झळकताना दिसून येत असून या तीन दिवसात बॉक्स ऑफिसवर २.२५ करोडचा गल्लादेखील कमावला आहे.
गावच्या एका सामान्य घरातील महत्वाकांक्षी युवकाची ही कथा असल्यामुळे, लोकांना 'बबन' हा आपल्यातलाच एक वाटून जातो. विशेष म्हणजे, 'बबन' या नावातच साधेपणा असून असे अनेक बबन आपणास आपल्या जवळच्या नाक्यावर, गल्ली बोळात तसेच कॉलेज कट्ट्यावर दिसून येतात. माणसांतल्या 'बबन'ची हीच खासियत या सिनेमात मांडण्यात आली आहे.
Also Read : ख्वाडा फेम भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे सांगतायेत, ख्वाडानंतर मी झालो होतो ब्लँक