अशी का झालीय सोनाली कुलकर्णीची अवस्था?, फोटो पाहून चाहते पडले चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 16:24 IST2022-02-01T16:24:15+5:302022-02-01T16:24:43+5:30
सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni)चा सोशल मीडियावरील फोटो चर्चेत आला आहे. या फोटोत तिच्या चेहऱ्यावर जखमा पाहायला मिळत आहेत.

अशी का झालीय सोनाली कुलकर्णीची अवस्था?, फोटो पाहून चाहते पडले चिंतेत
मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात घर केले आहे. नुकताच सोनालीचा पांडू (Pandu Movie) आणि झिम्मा (Jhimma Movie) हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतुक केले. दरम्यान आता सोनाली कुलकर्णीचा सोशल मीडियावरील फोटो चर्चेत आला आहे. या फोटोत तिच्या चेहऱ्यावर जखमा झालेल्या पाहायला मिळतो आहे. सोनालीचा हा फोटो पाहून चिंतेत पडले आहेत. मात्र तिचा हा फोटो तिचा आगामी चित्रपट व्हिक्टोरीया (Victoria Movie)मधील आहे.
सोनाली कुलकर्णी हिने आगामी चित्रपट व्हिक्टोरियाचे पोस्टर शेअर करत लिहिले की, प्रत्येक रहस्य कधी ना कधीतरी उलगडतंच ! या पोस्टरवर सोनाली कुलकर्णीच्या चेहऱ्यावर जखमा झालेल्या पाहायला मिळत आहेत.
व्हिक्टोरिया' या चित्रपटात सोनाली कुलकर्णी व्यतिरिक्त अभिनेता पुष्कर जोग, आशय कुलकर्णी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हीरा सोहल ही अभिनय क्षेत्रात पदार्पण करत असून जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी हे या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत.
'व्हिक्टोरिया' चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद ओमकार गोखले, जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर वैशल शाह सह निर्माता आहेत. या बिग बजेट चित्रपटाचे शूटिंग स्कॉटलंड येथे होणार आहे.