तुमच्या 'या' लाडक्या अभिनेत्री त्यांच्या नावापुढे का लावत नाही आडनाव ? वाचा कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 05:20 PM2021-08-07T17:20:20+5:302021-08-07T17:24:12+5:30
सायली संजीव आणि रसिका सुनिल सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही प्रचंड मोठी आहे.
कलाकार त्यांच्या अभिनयाने रसिकांची मने जिंकतात. रसिकांच्या मनावर ते अधिराज्य गाजवतात. रसिकांच्या मनात या कलाकारांची नावं घर करुन असतात. रसिकांच्या मनात या कलाकारांच्या अभिनयासह त्यांची नावं घर करुन असतात. या कलेच्या दुनियेत कलाकार नाव कमावण्यासाठी येतात. त्यांच्या नावानेच त्यांची वेगळी ओळख निर्माण होत असते. अनेक कलाकारांची नावं रसिकांच्या मनात घर करुन आहेत. असेच काही प्रसिद्ध कलाकार आहेत जे आपल्या नावासह त्यांचे आडनाव लावत नाही.
सायली संजीव आणि रसिका सुनिल सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही प्रचंड मोठी आहे. सोशल मीडियावर फोटो व्हिडीओ आगामी प्रोजक्ट्सची माहीती चाहत्यांसह शेअर करत असतात. सोशल मीडियावरही दोघे खूप लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना रस असतो. अनेकदा अभिनयक्षेत्रात आल्यानंतर कलाकार त्यांची मुळ नावात बदल करत दुस-याच नावाने नावारुपाला येतात. हा ट्रेंड बॉलिवूडमध्ये आहे. मराठीतही नावात बदल केलेला नसला तरी आडनाव मात्र अभिनेत्री लावतान दिसत नाही.
आपले पूर्ण नाव न लावता ते केवळ आपलं स्वतःचं नाव आणि त्यापुढे आपल्या वडिलांचे नाव लावतात. त्यामागे कोणते कारण आहे अद्याप स्पष्टपणे समोर आलेले नाही. मात्र त्या कलाकारांच्या भूमिकेच्यानावाप्रमाणेच त्यांचे खरं नाव रसिकांच्या लक्षात असते. अशाच कलाकारांपैकी दोन मराठमोळ्या अभिनेत्रींचा यांत आवर्जून उल्लेख करावा लागेल.
छोट्या पडद्यावरील 'काहे दिया परदेस' मालिकेतून घराघरात पोहचलेली सायली संजीव आपल्या नावापुढे आडनाव लावत नाही. सायलीचे आडनाव संजीव नसून ते तिच्या वडिलांचे नाव आहे.तिचे पूर्ण नाव सायली संजीव चांदसारकर असे आहे. सायली संजीवप्रमाणेच 'माझ्या नव-याची बायको' मालिकेतून रसिका सुनील ही रसिकांची आवडती बनली. रसिकाचे खरे नाव फार कमी जणांना माहित आहे. रसिकाचे पूर्ण नाव रसिका सुनील धाबडगावकर असे आहे. मात्र असं असलं तरी रसिका फक्त रसिका सुनील आडनाव न लावता शॉर्टकटच वापरते. यामागे नेमके काय कारण हे फक्त सायली आणि रसिकालाच माहिती.