‘फांदी’ चित्रपटात या गोष्टींचा होणार उलगडा,20जुलैला रसिकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 05:35 AM2018-06-22T05:35:26+5:302018-06-22T11:05:26+5:30
चित्रपटसृष्टीतच काम करण्याच्या ध्यासापायी अनेक कलाकार संधीच्या शोधात मुंबईत येतात. पण प्रत्येकालाच संधीचे सोनं करता येत असं नाही. संघर्ष ...
च त्रपटसृष्टीतच काम करण्याच्या ध्यासापायी अनेक कलाकार संधीच्या शोधात मुंबईत येतात. पण प्रत्येकालाच संधीचे सोनं करता येत असं नाही. संघर्ष करून खचलेले कलाकार माघारी परतल्याची अनेक उदाहरण असताना आपल्या प्रयत्नांवर पुरेपूर विश्वास असलेल्या कोल्हापूरमधील खानापूरच्या अजित साबळे यांचा चित्रपटसृष्टीचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. चित्रपटसृष्टीतच काम करण्याच्या ध्यासापायी अजित यांनी मुंबईचा रस्ता धरला. मुंबईत कुणाचीही ओळख नव्हती. सुरुवातीला मिळेल ते काम केले. कारण मुंबईत टिकाव धरणे आवश्यक होते. नाटक, मालिका, आणि चित्रपटांचा अनुभव घेतल्यानंतर आता ‘फांदी’ चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या दिग्दर्शकीय कौशल्याची चुणूक दाखवण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.
‘ध्वज क्रिएशनची’ प्रस्तुती असलेल्या ‘फांदी’ या चित्रपटाच्या लेखनाची व दिग्दर्शनापर्यंतची जबाबदारी अजित यांनी सांभाळली आहे. ‘फांदी’ या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूरच्या त्यांच्या आजरा तालुक्यात आणि चित्रनगरी गोरेगाव येथे पूर्ण झाले. मुंबईत येऊन चहाच्या गाडीवर काम करत दिग्दर्शनाची स्वप्न पाहणारे अजित साबळे आज ती सत्यात उतरवतायेत. येत्या २० जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
सायली शशिकांत पाटणकर या चित्रपटाच्या प्रस्तुतकर्त्या असून राजेश खारकर, सायली पाटणकर, महेंद्र सोमासे निर्माते आहेत. अरुण नलावडे, भूषण घाडी, नितीन आनंद बोढारे, संदीप जुवाटकर, विशाल सावंत, अमोल देसाई, बाबा करडे, सतीश हांडे, फिरोज फकीर, भाग्यश्री शिंदे, स्नेहा सोनावणे, सुगंधा सावंत, चंदा जांभळे या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.
‘फांदी’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद अजित साबळे यांनी लिहिले आहेत, तर गीतलेखन व संगीताची जबाबदारी कुणाल-करण यांनी सांभाळली आहे.आदर्श शिंदे, बेला शेंडे, नागेश मोरवेकर यांनी गाणी गायली आहेत. छायाचित्रण संजय बापू थोरात तर संकलन अनिल विठ्ठल थोरात यांचे आहे. कलादिग्दर्शन राहुल व्यवहारे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन गणेश सरवणकर यांचे आहे. भूषण आंगणे, मृणाली साबळे, विठोबा तेजस, अमोल देसाई, सचिन गायकवाड, जितेंद्र जे.बांभानिया, अनिल शिंदे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
‘फांदी’ या चित्रपटाची कथा आलेल्या अनुभवातूनच सुचल्याचं अजित सांगतात. काहीजण स्वत:च्या फायद्यासाठी अंधश्रद्धेचं जाळं कशाप्रकारे पसरवतात हे दाखवतानाच एका कुटुबांची राजकीय नेते आणि समाजव्यवस्थेकडून केली जाणरी फसवणूक हा चित्रपट मांडतो. समाजातील वास्तव मार्मिकपणे मांडत प्रेक्षकांना त्या वास्तवाची जाणीव करून देण्याच्या प्रयत्नाला प्रेक्षक नक्कीच दाद देतील असा विश्वास अजित व्यक्त करतात. २० जुलैला ‘फांदी’ सर्वत्र प्रदर्शित होतोय.