हा महामूर्खपणा; यापुढे विक्रम गोखलेंसोबत काम करणार नाही...; मराठी निर्मात्याची जाहीर घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 02:53 PM2021-11-17T14:53:16+5:302021-11-17T14:55:05+5:30

Vikram Gokhale : जे काही ते बोलले त्याचा मनापासून धिक्कार करतो, निर्मात्याचं ट्विट चर्चेत

will never going to work with vikram gokhale in future marathi producer nilesh navalakha tweet | हा महामूर्खपणा; यापुढे विक्रम गोखलेंसोबत काम करणार नाही...; मराठी निर्मात्याची जाहीर घोषणा

हा महामूर्खपणा; यापुढे विक्रम गोखलेंसोबत काम करणार नाही...; मराठी निर्मात्याची जाहीर घोषणा

googlenewsNext

भारताला 1947 साली मिळालं ते स्वातंत्र्य भीक होती, खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं, असं कंगना राणौत (  Kangana Ranaut On 1947 Freedom Being 'Bheek' ) बरळली आणि तिच्या या विधानाचे देशभर तीव्र पडसाद उमटले. अशात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी अचानक या वादात उडी घेतली. कंगनाच्या वक्तव्याचं समर्थन करते, कंगना जे बोलली ते खरं आहे. तिच्या मताशी मी सहमत आहे, असं म्हणून त्यांनी नवा वाद ओढवून घेतला. याच पार्श्वभूमीवर आता एका निर्मात्याने भविष्यात कधीही विक्रम गोखलेंसोबत काम न करण्याचं जाहीर केलं आहे.
होय, शाळा, फँड्री अशा गाजलेल्या चित्रपटांचे मराठमोळे निर्माते निलेश नवलाखा (Nilesh Navalakha) यांनी एक ट्विट करत याची घोषणा केली आहे.
‘मी विक्रम गोखलेंबरोबर काम केलं आहे, कलाकार म्हणून मला त्यांचा प्रचंड अभिमान आहे परंतु त्यांनी कंगना रानावत जे बोलली त्याचं समर्थन करणं म्हणजे महामूर्खपणा आहे. जे काही ते बोलले त्याचा मनापासून धिक्कार करतो व भविष्यात त्यांच्याबरोबर काम करणार नाही हे पण घोषित करतो,’ असं ट्विट नवलाखा यांनी केलं.

काय म्हणाले होते विक्रम गोखले?
देशाला मिळालेलं स्वातंत्र्य भीक होतं, असं कंगना म्हणाली होती. विक्रम गोखले यांनी कंगनाच्या या भूमिकेचं स्पष्ट शब्दांत समर्थन केलं होतं. कंगना  जे म्हणाली आहे ते खरं आहे. ते स्वातंत्र्य भीक मागूनच मिळालेलं आहे यावर मी सहमत आहे. हे दिलं गेलेलं आहे बरं का? ज्या योद्ध्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांना फाशी देताना मोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही. आपले लोक ब्रिटिशांविरोधात उभे आहेत हे पाहूनसुद्धा वाचवलं नाही, असं ते म्हणाले होते.
 

Web Title: will never going to work with vikram gokhale in future marathi producer nilesh navalakha tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.