'महिलांनी पुरुषांशिवाय…', अभिनेत्री मानसी नाईकची 'ती' पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 17:40 IST2022-11-19T17:39:45+5:302022-11-19T17:40:10+5:30
Manasi Naik : अभिनेत्री मानसी नाईक हिने नुकतेच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

'महिलांनी पुरुषांशिवाय…', अभिनेत्री मानसी नाईकची 'ती' पोस्ट चर्चेत
जगभरात १९ नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय पुरुष दिन (International Mens Day) म्हणून साजरा केला करतो. पुरुषांशी निगडित वेगवेगळे विषय आणि समस्यांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने अनेक सेलिब्रेटी हे सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत आहेत. अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) हिने नुकतेच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.
अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. नुकतेच तिने आंतररराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचे सुंदर फोटो शेअर केले आहे. यासोबत तिने अप्रत्यक्षरित्या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिले की, मी एका अशा कुटुंबात वाढले आहे, जिथे महिलांनी पुरुषांसोबत मिळून किंवा पुरुषांशिवाय बऱ्याच गोष्टी करून दाखवल्या आहेत. त्यामुळे आता ती क्षमता गमावण्याची भिती नसेल. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मानसी नाईक मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'एकता - एक पॉवर', 'कुटुंब', 'तीन बायका फजिती ऐका', 'जबरदस्त', 'मर्डर मेस्त्री', 'ढोलकी', 'हू तू तू', 'कोकणस्थ' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. 'बाई वाडयावर या' हे गाणे सुपरहिट ठरले होते.