Women's Day Special : सुयश टिळकने दिली महिला फायर फायटर्सना भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 08:00 AM2019-03-08T08:00:00+5:302019-03-08T08:00:00+5:30

'महिला दिन' निमित्त, अभिनेता सुयश टिळकने महाराष्ट्राच्या जिगरबाज फायर फाइटर्स महिलांची अभिनेता सुयश टिळकने दखल घेतली आहे

Women's Day Special: Suyash Tilak visited the women's fire fighters | Women's Day Special : सुयश टिळकने दिली महिला फायर फायटर्सना भेट

Women's Day Special : सुयश टिळकने दिली महिला फायर फायटर्सना भेट

googlenewsNext


आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. पुरुषांच्या खांद्यावर खांदा लावत, अशक्यप्राय वाटणाऱ्या अनेक क्षेत्रात आज महिला काम करताना दिसून येत आहे. अग्निशामक सारख्या शारीरिक आणि धोकादायक क्षेत्रात देखील आज भारतीय महिलांनी आपला यशस्वी पाय रोवला आहे. मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात आग लागण्यासारख्या असंख्य घटना घडत असतात, त्यावेळी या महिला फायर फायटर्स पुरुष कर्मचाऱ्यांसोबत आगीशी दोन हात करताना दिसून येत आहे. अशा या महाराष्ट्राच्या जिगरबाज फायर फाइटर्स महिलांची 'महिला दिन' निमित्त, अभिनेता सुयश टिळकने दखल घेतली आहे. त्यांच्या शौर्याला आणि धाडसाला सलाम करण्यासाठी सोशल हुटच्या सहकार्याने, भायखळा अग्निशमन केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या फायर लेडींची त्याने भेट घेतली. 

मुंबई अग्निशमन दलाचे मुख्यालय असलेल्या भायखळा अग्निशमन केंद्रातील महिलांची कार्यप्रणाली आणि त्यांचा जीवनप्रवास यादरम्यान त्याने जाणून घेतला. 'स्त्री आपल्या समाजातील एक महत्वाचा घटक आहे. 'आग' या ज्वलंत वस्तूचा वापर ती आधीपासून करत आली आहे. मात्र, आता केवळ स्वयंपाकासाठी नव्हे तर, शहराचे रक्षण करण्यासाठीदेखील आजची स्त्री आगीच्या सान्निध्यात जात आहे. त्यामुळे या सर्व महिलांच्या धाडसाचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे' असे मत सुयशने मांडले. 


सुयश टिळकने छोट्या पडद्यावर आपले महत्वाचे स्थान प्रस्थापित केले आहे. विविध मालिकांमधून घराघरात पोहोचलेला सुयश, केवळ कलाकार म्हणून नव्हे समाजातील एक सुजाण नागरिक म्हणूनदेखील प्रचलित आहे. अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात त्याचा सहभाग आवर्जून असतो.

Web Title: Women's Day Special: Suyash Tilak visited the women's fire fighters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.