बायकांच्या ग्रुप्सची ट्रेनमध्ये धमाल..! अभिनेत्री गौरी देशपांडेचा अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2022 11:29 AM2022-10-09T11:29:56+5:302022-10-09T11:30:09+5:30

माझं बारावीपर्यंतचे शिक्षण नाशिकमध्ये झालं. त्यानंतर स्पीच थेरपीमध्ये ग्रॅज्युएशन करायला मी पहिल्यांदा मुंबईत आले होते.

Women's groups have fun in the train..! Experience of actress Gauri Deshpande | बायकांच्या ग्रुप्सची ट्रेनमध्ये धमाल..! अभिनेत्री गौरी देशपांडेचा अनुभव

बायकांच्या ग्रुप्सची ट्रेनमध्ये धमाल..! अभिनेत्री गौरी देशपांडेचा अनुभव

googlenewsNext

- गौरी देशपांडे, अभिनेत्री

माझं बारावीपर्यंतचे शिक्षण नाशिकमध्ये झालं. त्यानंतर स्पीच थेरपीमध्ये ग्रॅज्युएशन करायला मी पहिल्यांदा मुंबईत आले होते. अभिनयाची आवड आधीपासूनच होती. पण, मुंबईतल्या त्या शासकीय महाविद्यालयात फारसे नाट्यविषयक उपक्रम नसल्याने विशेष उत्तेजन मिळालं नाही. मग मी मास्टर्स करायला भारती विद्यापीठ, पुणे इथे प्रवेश घेतला आणि अभ्यासासोबतच विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन मी अभिनयही गांभीर्याने घेतला. पुण्यात राहून मी मुंबईत नित्यनेमाने ऑडिशन्स द्यायला येत होते. पण मुंबईच्या फार मर्यादित भागात वावर व्हायचा आणि पुन्हा पुण्याला परतायचे. पण २०२० मध्ये मला ‘बायको अशी हवी’, नावाची मालिका मिळाली आणि मी मुंबईत स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर मी मुंबईत आले होते. तेव्हा जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आलं होतं. मी गोरेगाव पूर्वेला वनराई कॉलनीमध्ये भाड्याने जागा घेतली होती. इथे महाराष्ट्रातल्या विविध भागातून आलेले नवोदित आणि होतकरू कलाकार राहतात. मी ट्रेन, बस किंवा रिक्षा जे मिळेल त्या वाहनाने प्रवास करत होते. इथली घाई, गर्दी, वेग हे सगळंच माझ्यासाठी नवीन होतं. 
रस्त्याच्या एका बाजूला गगनचुंबी इमारती आणि त्याच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला झोपडपट्टी असं वास्तव असणारं कदाचित हे जगातलं एकमेव शहर असेल. विविध आर्थिक स्तरावरची जीवनशैली जगणारी माणसं कुठेतरी एकाच पातळीवर येऊन त्यांचे व्यवहार सुरू असतात. प्रचंड ऊर्जा आणि तत्परता असलेल्या या शहरात दिवसभराच्या कष्टाने माणसं फारशी दमलेली दिसत नाहीत.

संध्याकाळी ऑफिसमधून परतणाऱ्या बायकांचे ट्रेनमध्ये वेगवेगळे ग्रुप्स असतात आणि त्यात त्या धमाल मजा करत असतात. बहुतेक प्रत्येकाने इथे आपापल्या आनंदाच्या जागा शोधलेल्या आहेत. अनेकदा या किच्चाट गर्दीत आपण एकटेच आहोत असं वाटतं. गगनचुंबी इमारतीतील आपण ठिपक्याएवढी छोटी दिसणारी खिडकी आहोत, असं वाटतं.
- शब्दांकन : तुषार श्रोत्री

Web Title: Women's groups have fun in the train..! Experience of actress Gauri Deshpande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.