workout partner! अंकित मोहनने चिमुकल्या बाळासह केला हेवी वर्कआऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 18:51 IST2022-07-04T18:50:51+5:302022-07-04T18:51:16+5:30
Ankit Mohan: अंकितने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत त्याचं लहानसं बाळ दिसत असून या बाळाला पोटाशी बांधून तो हेवी वर्कआऊट करत आहे.

workout partner! अंकित मोहनने चिमुकल्या बाळासह केला हेवी वर्कआऊट
मराठीसह हिंदी मालिकांमध्ये झळकलेला लोकप्रिय अभिनेता अंकित मोहन (Ankit Mohan) अलिकडेच बाबा झाला आहे. त्याची पत्नी अभिनेत्री रुची सवर्ण (Ruchi Savarn) हिने काही दिवसांपूर्वीच एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला. सोशल मीडियावर सक्रीय असलेली ही जोडी वरचेवर आपल्या बाळासोबतचे काही फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. मात्र, यावेळी अंकितने थेट जीममध्ये आपल्या बाळाला नेत त्याच्यासोबत हेवी वर्कआऊट केला.
अंकितला अभिनयासह फिटनेसची विशेष आवड आहे. त्यामुळे तो न चुकता वर्कआऊट करतो. याचे काही फोटो वा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर शेअर करत असतो. सोबतच चाहत्यांनादेखील फिट राहण्याचं आवाहन करत असतो. मात्र, यावेळी तो त्याच्या चिमुकल्या बाळामध्ये फिटनेसची आवड निर्माण करत असल्याचं दिसून येत आहे.
अंकितने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत त्याचं लहानसं बाळ दिसत असून या बाळाला पोटाशी बांधून तो हेवी वर्कआऊट करत आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर त्यावर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
दरम्यान, एमटिव्ही रोडीज या कार्यक्रमापासून अंकित मोहनने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. 'मिले जब हम तुम', 'घर आ जा परदेसी', 'महाभारत', 'कुमकुम भाग्य' यांसारख्या मालिकांमधल्या त्याच्या भूमिका गाजल्या. तसंच तो 'मन फकिरा' या सिनेमातही तो झळकला होता.