फिटनेसच्या बाबतीत मलायकालाही टक्कर देते ही मराठमोळी अभिनेत्री, योगा मुव्हज पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 05:51 PM2021-12-18T17:51:07+5:302021-12-18T17:51:38+5:30
मराठी इंडस्ट्रीतही मलायकाप्रमाणे(Malaika Arora) आणखी एक अभिनेत्री आहे जी प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. तिच्या दिवसाची सुरुवातच योगा वर्कआऊटने होते.मलायकाप्रमाणेच ती सुद्धा तितकीच फिटनेस फ्रिक आहे.
सुंदर दिसणं आणि उत्तम आरोग्य असणं कोणाला बरं नाही आवडणार..... या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात आरोग्य उत्तम राखणं सगळ्यात कठीण काम... मात्र सा-यांच्या या अडचणी आता दूर होणार आहेत.. कारण छैय्या छैय्या गर्ल मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच तिच्या वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटोमुळे इतरांना प्रेरणा देत असते. ती फिटनेस फ्रिक आहे हे जगजाहीर आहे. मलायका ही चोखदंड आहे. ती जे काही करते त्यात काही ना काही खासियत असतेच. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही मलायकाचे फिटनेस प्रेम पाहून भल्या भल्यांची बोलती बंद नाही झाली तरच नवल.
मराठी इंडस्ट्रीतही मलायकाप्रमाणे आणखी एक अभिनेत्री आहे जी प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. तिच्या दिवसाची सुरुवातच योगा वर्कआऊटने होते.मलायकाप्रमाणेच ती सुद्धा तितकीच फिटनेस फ्रिक आहे. फिट राहण्यासाठी माधवी नियमित योगा करते. माधवीच्या फिट राहण्यामध्ये योगविद्येचे मोलाचे योगदान असून ती तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देखील तिच्या योगा पोझेस मधील फोटोज तिच्या चाहत्यांसाठी शेअर करते.
जीवनात आमूलाग्र असा बदल हवा असेन तर योगा करणे उत्तम असल्याचे माधवीला वाटते.गेल्या काही वर्षापासून माधवी नित्यनियमाने योगा करते आणि इतरांनाही योगा करण्याचा सल्ला देते. योगासनं आणि शिरशासन करतानाचे तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर ती अपलोड करत असते.
योगा करत असल्यामुळे मानसिक समाधान मिळत असल्याचेही माधवी सांगते. योगासनं आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवत असल्याचे तिनं म्हटलं आहे.फिट राहण्यासाठी योगापेक्षा दुसरा चांगला पर्याय असूच शकत नाही. त्यामुळं मी पारंपरिक योगा करते.रोज सकाळी 10 ते 11 या आम्ही वेळेत योगाभ्यास करते. त्यासोबत योग्य डाएट घेत स्वतःला मेटेंन ठेवते.