'बिग बॉस' जिंकल्यामुळे सूरजवर सिनेमा बनला? रितेश देशमुखने स्पष्टच सांगितलं, म्हणाला- "केदार शिंदेंनी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 17:19 IST2025-04-12T17:16:26+5:302025-04-12T17:19:40+5:30

Suraj Chavan's Zapuk Zupuk Movie : रिलस्टार ते बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता असा प्रवास करणारा सूरज चव्हाण लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्याच्या 'झापूक झुपूक' चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला.

Zapuk Zupuk Movie made because Suraj Chavan won 'Bigg Boss marathi 5'? Riteish Deshmukh made it clear, said- "Kedar Shinde..." | 'बिग बॉस' जिंकल्यामुळे सूरजवर सिनेमा बनला? रितेश देशमुखने स्पष्टच सांगितलं, म्हणाला- "केदार शिंदेंनी..."

'बिग बॉस' जिंकल्यामुळे सूरजवर सिनेमा बनला? रितेश देशमुखने स्पष्टच सांगितलं, म्हणाला- "केदार शिंदेंनी..."

रिलस्टार ते बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वा(Bigg Boss Marathi Season 5)चा विजेता असा प्रवास करणारा सूरज चव्हाण (Suraj Chavan) लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्याच्या 'झापूक झुपूक' (Zapuk Zupuk Movie ) चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. यावेळी अभिनेता  बिग बॉस मराठी ५चा होस्ट रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) उपस्थित होता. यावेळी त्याने सूरज चव्हाण, केदार शिंदे (Kedar Shinde) आणि सिनेमावर भाष्य केले.

कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये सूरज चव्हाणवर सिनेमा बनवणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी या शोमध्ये सांगितल्याप्रमाणे सहा महिन्यात हा सिनेमा भेटीला येतो आहे.  दरम्यान सूरज शोचा विजेता ठरल्यामुळे केदार शिंदे यांनी त्याच्यावर सिनेमा बनवला, अशी चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. मात्र ट्रेलर लाँचवेळी या चर्चेवर रितेश देशमुखने यावर मौन सोडले आहे.

रितेश म्हणाला...
रितेश देशमुख म्हणाला की, ''बिग बॉसची सुरुवात झाली तेव्हा तो माझा आणि सूरजचा पहिला प्रवास होता. केदार भाऊंचाही हा पहिला प्रवास होता. जेव्हा सूरज बिग बॉसच्या घरात तिसऱ्या आठवड्यात होता, तेव्हाच केदार भाऊंनी त्याच्यावर सिनेमा बनवण्याचे ठरविले होते. त्यांनी त्यावेळी मला म्हटले होते की, विजेता कोणीही असू देत, मी सूरजवर चित्रपट बनवणार आणि मी या गोष्टीचा साक्षीदार आहे. त्यामुळे सूरज जिंकला म्हणून त्याच्यावर सिनेमा बनवण्यात आला आहे, असे नाही. केदार भाऊंची हिंमत आणि कमिटमेंटला माझा सलाम. या चित्रपटाचे संगीत, एडिटिंग, कथा सगळंच अप्रतिम आहे. हा सिनेमा ब्लॉकबस्टर आहे. सूरज आणि संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा. महाराष्ट्रातील प्रेक्षक आणि सूरजचे चाहते नक्कीच सिनेमागृहात जाणार आहे, यात काही शंका नाही. मला सूरजचा खूप अभिमान वाटतो.''अशाप्रकारे सूरजला आणि केदार शिंदेंना सिनेमावरुन ट्रोल करणाऱ्यांना रितेशने चांगले प्रत्युत्तर दिले आहे.

'झापूक झुपूक' सिनेमाबद्दल
झापूक झुपूक सिनेमात सूरज चव्हाण व्यतिरिक्त पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी, दिपाली पानसरे, जुई भागवत, इंद्रनील कामत, पायल जाधव आणि हेमंत फरांदे हे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट २५ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  जिओ स्टुडिओ आणि केदार शिंदे प्रोडक्शनने या सिनेमाची निर्मिती केली आहे. 

Web Title: Zapuk Zupuk Movie made because Suraj Chavan won 'Bigg Boss marathi 5'? Riteish Deshmukh made it clear, said- "Kedar Shinde..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.