​झी टॉकिज प्रस्तुत नसते उद्योगच्या मंचावर 'आम्ही दोघी'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 07:00 AM2018-02-22T07:00:00+5:302018-02-22T12:30:00+5:30

विशिष्ट विनोदांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या झी टॉकीजच्या नसते उद्योग या चॅट शोमध्ये सध्या प्रेक्षक एक चांगला बदल अनुभवत ...

Zee Talkies do not appear on the stage of the industry 'we both' | ​झी टॉकिज प्रस्तुत नसते उद्योगच्या मंचावर 'आम्ही दोघी'

​झी टॉकिज प्रस्तुत नसते उद्योगच्या मंचावर 'आम्ही दोघी'

googlenewsNext
शिष्ट विनोदांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या झी टॉकीजच्या नसते उद्योग या चॅट शोमध्ये सध्या प्रेक्षक एक चांगला बदल अनुभवत आहेत. उत्तम कॉमेडी आणि मनोरंजन देणारा झी टॉकीजचा कार्यकम नसते उद्योग आता नव्या रुपात, नव्या ढंगात आणि नवीन वेळेवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेक्षकांना पोट धरून हसवण्यासाठी नसते उद्योगच्या मंचावर अवलिया कलाकार करणार नुसते उद्योग आणि त्याचबरोबर मराठी चित्रपट सृष्टीतील मराठी सिनेमाला महत्व देऊन त्याला एक मोठं व्यासपीठ देण्यासाठीच झी टॉकीजने हे अनोखे पाऊल उचलले आहे. मराठी चित्रपटांना घराघरात पोहोचवणारी झी टॉकीज ही वाहिनी आता आगामी मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी देखील मोलाचा वाटा उचलत आहे. नसते उद्योग या कार्यक्रमाच्या नवीन रुपरेषेत प्रेक्षकांचे लाडके कलाकार क्रांती रेडकर आणि प्रसाद ओक हे सूत्रसंचालकाची भूमिका बजावत आहेत तसेच अंशुमन विचारे, नम्रता आवटे, प्रभाकर मोरे हे हास्यसम्राट प्रमोशनसाठी आलेल्या मराठी चित्रपटावर विनोदी स्कीट सादर करून प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत.  
येत्या रविवारी नसते उद्योगच्या रंगमंचावर आम्ही दोघी या सिनेमातील कलाकार येणार आहेत. मराठी सिनेसृष्टीतील दोन आघाडीच्या अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट तसेच हँडसम हंक भूषण प्रधान नसते उद्योगच्या सेटवर धमाल करताना प्रेक्षक पाहू शकणार आहेत.    
न. स. ते. उद्योग आता नव्या स्वरूपात मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी पुढे सरसावत आहे. प्रेक्षकांना ही संकल्पना आवडली असल्याचा या कार्यक्रमाच्या टीमला विश्वास आहे. नसते उद्योग या कार्यक्रमात आम्ही दोघी या चित्रपटातील मुक्ता, प्रिया आणि भुषण खूप धमाल मस्ती करणार आहेत. तसेच त्यांच्या चित्रपटाविषयी देखील प्रेक्षकांना विविध माहिती देणार आहेत. एवढेच नव्हे तर चित्रीकरणाच्या वेळी घडलेले किस्से देखील ते शेअर करणार आहेत. प्रेक्षकांना न. स. ते. उद्योगचा हा भाग येत्या रविवारी २५ फेब्रुवारीला  संध्याकाळी ६ वाजता झी टॉकिजवर पाहायला मिळणार आहे.

Also Read : गौरी देशपांडे यांच्या कथेवर बेतलेला 'आम्ही दोघी’ 

Web Title: Zee Talkies do not appear on the stage of the industry 'we both'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.