सोनाक्षी सिन्हानंतर मराठमोळ्या दिग्दर्शकाने उडवला लग्नाचा बार! लग्नातील फोटो समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 01:24 PM2024-06-29T13:24:39+5:302024-06-29T13:34:14+5:30

कार्तिक आर्यनच्या मराठमोळ्या दिग्दर्शकाचं शुभमंगल सावधान! लग्नातील फोटो झाले व्हायरल

marathi director sameer vidwans tied knot with juilee sonalkar wedding photos | सोनाक्षी सिन्हानंतर मराठमोळ्या दिग्दर्शकाने उडवला लग्नाचा बार! लग्नातील फोटो समोर

सोनाक्षी सिन्हानंतर मराठमोळ्या दिग्दर्शकाने उडवला लग्नाचा बार! लग्नातील फोटो समोर

सिनेविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने बॉयफ्रेंड जहीर इक्बालशी लग्नगाठ बांधली. सोनाक्षीपाठोपाठ बॉलिवूडच्या मराठमोळ्या दिग्दर्शकानेही लग्नाचा बार उडवला आहे. प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक समीर विद्वांसने गुपचूप लग्न केलं आहे. जुईली सोनाळकरबरोबर सात फेरे घेत समीरने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून समीरची लगीनघाई सुरू होती. त्याच्या केळवणाचे आणि हळदीचे फोटो व्हायरल झाले होते. शनिवारी (२९ जून) समीर विद्वांस आणि जुईली सोनाळकरने कुटुंबीय आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. मराठी अभिनेता हेमंत ढोमेने समीर विद्वांस आणि जुईली यांच्या लग्नातील फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

आयुष्यातील या खास क्षणांसाठी समीर आणि जुईलीने खास पारंपरिक पोशाख केला होता. हिरव्या रंगाच्या साडीत नववधू नटली होती. तर कुर्ता, पायजमा आणि डोक्यावर टोपी असा पेहराव समीरने केला होता. समीर आणि जुईलीने व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी १४ फेब्रुवारीला साखरपुडा केला होता. त्यानंतर आता लग्नाच्या बेडीत अडकत त्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

दिग्दर्शक असण्याबरोबरच समीर एक अभिनेता आणि उत्तम लेखकही आहे. अनेक मराठी सिनेमांचं त्याने लेखन केलं आहे. तर 'मला काहीच प्रॉब्लेम नाही', 'व्हाय झेड', 'धुरळा', 'टाइम प्लीज', 'डबल सीट', 'आनंदी गोपाळ' या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. 'सत्यप्रेम की कथा' या सिनेमाची दिग्दर्शनाची बाजू सांभाळत त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी या सिनेमात मुख्य भूमिकेत होते. 

Web Title: marathi director sameer vidwans tied knot with juilee sonalkar wedding photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.