मराठी चित्रपटसृष्टीत फिरता चषक!

By Admin | Published: April 16, 2015 12:40 AM2015-04-16T00:40:10+5:302015-04-16T00:40:10+5:30

फिरती ढाल किंवा फिरता चषक ही खरं तर क्र ीडाक्षेत्राची मक्तेदारी; परंतु हेच चित्र आता मराठी चित्रपटसृष्टीतही पाहायला मिळत आहे.

Marathi film industry touring champion! | मराठी चित्रपटसृष्टीत फिरता चषक!

मराठी चित्रपटसृष्टीत फिरता चषक!

googlenewsNext

राज चिंचणकर ल्ल मुंबई
फिरती ढाल किंवा फिरता चषक ही खरं तर क्र ीडाक्षेत्राची मक्तेदारी; परंतु हेच चित्र आता मराठी चित्रपटसृष्टीतही पाहायला मिळत आहे. या क्षेत्रातही एका फिरत्या चषकाची एन्ट्री झाली आहे. ‘दुनियादारी’ या चित्रपटाच्या टीमने या प्रकाराची मुहूर्तमेढ रोवली असून, या फिरत्या चषकाची मऱ्हाठमोळी दुनियादारी सध्या चित्रपटसृष्टीत सुरू आहे.
संजय जाधवच्या ‘दुनियादारी’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर यश मिळवल्यावर या टीमच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. बॉक्स आॅफिसवर जो चित्रपट त्याच्या आधीच्या चित्रपटाचा विक्र म मोडेल, त्याला फिरता चषक देण्याची ही कल्पना होती. ‘दुनियादारी’ने आपले नाणे खणखणीत वाजवल्यानंतर दिग्दर्शक रवी जाधवचा ‘टाइमपास’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. दगडू आणि प्राजक्ताच्या जुळलेल्या केमिस्ट्रीमुळे या चित्रपटाने ‘दुनियादारी’चा रेकॉर्ड ब्रेक केला. त्यावेळी हा फिरता चषक ‘दुनियादारी’च्या टीमने ‘टाइमपास’च्या टीमकडे दिला.
‘टाइमपास’च्या नंतर रितेश देशमुखने ‘लय भारी’चा नारा देत मराठी चित्रपटात दणक्यात एन्ट्री घेतली आणि हा चित्रपट बॉक्स आॅफिसवरसुद्धा भारी ठरला. परिणामी, रेकॉर्ड ब्रेकची पुनरावृत्ती झाली आणि ‘लय भारी’ चित्रपटाने ‘टाइमपास’ला मागे टाकले. त्यामुळे रवी जाधवने तो फिरता चषक ‘लय भारी’च्या ओंजळीत घातला. आता रितेशच्या हाती हा चषक किती काळ राहील, याबाबत उत्सुकता आहे आणि अर्थातच याला कारण आहे, तो काही दिवसांतच प्रदर्शित होणारा टाइमपास २ हा चित्रपट ! रवी जाधव पुन्हा या चषकावर दावा सांगणार का, याबाबतची चर्चा आता चित्रपटसृष्टीत सुरू झाली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत या फिरत्या चषकाची सुरू झालेली प्रथा चांगली आहे; परंतु रवी जाधवचा चित्रपट आता येत असल्याने त्याने मला दिलेला हा चषक केवळ काही दिवसांसाठीच माझ्याकडे राहणार आहे, याची मला जाणीव आहे.
- रितेश देशमुख,
अभिनेता

Web Title: Marathi film industry touring champion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.