मराठी चित्रपटांचा दर्जा सुधारतोय, पण...

By Admin | Published: May 4, 2016 01:46 AM2016-05-04T01:46:36+5:302016-05-04T01:46:36+5:30

‘परतु’ या मराठी चित्रपटाची कॅनडातील हिडन जेम्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड करण्यात आली आहे. ‘परतु’ चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या या भरारीबाबत या चित्रपटात

Marathi films are improving, but ... | मराठी चित्रपटांचा दर्जा सुधारतोय, पण...

मराठी चित्रपटांचा दर्जा सुधारतोय, पण...

googlenewsNext

‘परतु’ या मराठी चित्रपटाची कॅनडातील हिडन जेम्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड करण्यात आली आहे. ‘परतु’ चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या या भरारीबाबत या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेले अभिनेते किशोर कदम यांनी ‘सीएनएक्स’शी मारलेल्या गप्पा...

‘परतु’ या मराठी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या यशाबद्दल काय सांगाल?
- मराठी चित्रपटात अधिकाधिक चांगले विषय सध्या हाताळले जात आहेत. अनेक तरुण मुले मराठी चित्रपटांकडे आकर्षित होत आहेत. मराठीत अनेक तरुण दिग्दर्शक काम करत आहेत. या सगळ््यामुळे मराठीकडे पाहाण्याचा दृष्टिकोन खूप बदलला आहे. आज मराठी चित्रपटांचे बजेटही वाढलेले आहे, तसेच तांत्रिकदृष्ट्या मराठी चित्रपट समृद्ध होत आहेत. या सगळ््यामुळे केवळ भारतातच नव्हे, तर जगभर मराठी चित्रपटांचे कौतुक केले जात आहे.

मराठीत आज चांगले चित्रपट बनवले जात असले त्यांची संख्या खूपच कमी आहे, याचे कारण काय?
- चित्रपटाची निर्मिती करावी, या झगमगत्या दुनियेचा भाग व्हावे, अशी अनेकांची इच्छा असते. खरे तर त्यांना चित्रपटांच्या तंत्राबद्दल काहीच माहिती नसते. अशा वेळी अक्षरश: त्यांना लुबाडून चित्रपट बनवले जातात. अशी वृत्ती असलेल्या लोकांची मराठी चित्रपटसृष्टीत संख्या खूप आहे, यामुळेच दर्जेदार चित्रपटांची संख्या आपल्याकडे खूप कमी आहे.

या फेस्टिव्हलमध्ये ‘परतु’ची केवळ निवडच झाली नाही, तर या फेस्टिव्हलची सुरुवात ‘परतु’ या चित्रपटाने होणार आहे, हे खरं आहे का?
- या फेस्टिव्हलची दर वर्षी एक वेगळी थिम असते. या वर्षी महिला सक्षमीकरण अशी थिम असल्याने, ‘परतु’ या चित्रपटाने या फेस्टिव्हलला सुरुवात व्हावी, असे त्यांनी ठरवले आहे. आपल्या मराठी चित्रपटाने इतक्या मोठ्या फेस्टिव्हलची सुरुवात होणेही आपल्या सगळ््यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

या फेस्टिव्हलला चित्रपटाची टीम हजर राहाणार आहे का?
- चित्रपटाची संपूर्ण टीम कॅनडाला जात नसली, तरी आमचे दिग्दर्शक नितीन अडसूळ फेस्टिव्हलला जातीने हजर राहणार आहेत. चित्रपट सुरू होण्यापूर्वी ते चित्रपटाविषयी उपस्थितांना माहिती देणार असून, चित्रपटाचे स्क्रिनिंग झाल्यानंतर उपस्थितांशी संवादही साधणार आहेत.

तुम्ही गेल्या काही वर्षांत सामाजिक प्रश्नांवर आधारित चित्रपट करत आहात, याचे कारण काय?
- मी चित्रपटसृष्टीत अनेक वर्षे काम करत आहे. वेगळ््या प्रकारच्याच भूमिका करायला मला आवडतात, हे अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांना माहीत आहे. त्यामुळेच वेगळ््या पठडीतील भूमिका असल्यास मला चित्रपटासाठी नक्कीच विचारले जाते. फँड्री, जोगवा यांसारख्या माझ्या काही चित्रपटांतून मला लोकांपर्यंत सामाजिक संदेश पोहोचवता आला, याचा मला आनंदच आहे. ‘परतु’ या चित्रपटाचीही कथा आवडल्यामुळेच मी हा चित्रपट स्वीकारला होता. या चित्रपटाची कथा ऐकून मी अक्षरश: हेलावून गेलो होतो. आज या चित्रपटाला मिळत असलेल्या यशामुळे मी खूप आनंदित आहे.

- prajakta.chitnis@lokmat.com

Web Title: Marathi films are improving, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.