मराठी इंडस्ट्री होतेय प्रोफेशनल

By Admin | Published: January 22, 2016 02:16 AM2016-01-22T02:16:40+5:302016-01-22T02:16:40+5:30

सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय समाजासमोर आणले जात आहेत. यामध्ये काही मनोरंजनात्मक आहेत, तर काही समाजातील सत्य परिस्थितीची जाणीव करून देणारे

Marathi industry is professional | मराठी इंडस्ट्री होतेय प्रोफेशनल

मराठी इंडस्ट्री होतेय प्रोफेशनल

googlenewsNext

सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय समाजासमोर आणले जात आहेत. यामध्ये काही मनोरंजनात्मक आहेत, तर काही समाजातील सत्य परिस्थितीची जाणीव करून देणारे. कट्यार काळजात घुसली, मुंबई-पुणे-मुंबई, नटसम्राट या चित्रपटांचा यामध्ये विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. कारण, या चित्रपटांनी 1-2 कोटी नाही, तर प्रत्येकी 18 कोटींचा गल्ला बॉक्स आॅफिसवर जमवण्याची किमया करून दाखवली आहे.
याचे आणखी एक कारण म्हणजे, या सगळ्याच चित्रपटांनी मार्केटिंग आणि प्रमोशनचा कल्पकतेने वापर केला. फिल्मचे लॉचिंग बॉलीवूडच्या स्टाइलने सिस्टेमॅटिक केले. त्याचबरोबर मराठीमध्ये ‘सुपरस्टार’ ही कन्स्पेप्ट नव्याने निर्माण झाली आहे. नाना पाटेकर, स्वप्नील जोशी, सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे या सुपस्टार्सचे चित्रपट केवळ नावावरच गर्दी खेचतात. त्याचबरोबर साऊथ फिल्म इंडस्ट्रीच्या धर्तीवर ‘सटार ड्रिव्हन’ इंडस्ट्री म्हणून मराठी चित्रपटसृष्टीची वाटचाल सुरू आहे. बॉलीवूडमधील संजय लीला भन्साली, अक्षय कुमार, अजय देवगण, शाहरुख खान, रोहित शेट्टीसारख्या दिग्दर्शक, निर्मात्यांना मराठी इंडस्ट्री भुरळ घालत आहे. मराठी इंडस्ट्रीसाठी ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे.
मराठी इंडस्ट्रीची यशाची पायरी
जसे जसे अमराठी दिग्दर्शक, कलाकार मराठी चित्रपटांत काम करीत आहेत. तसतसं मराठीमध्येही प्रोफेशनॅलिझममध्ये लक्षणीय वाढ होताना पाहायला मिळत आहे. याचा फायदा चित्रपटाच्या व्यवसायावर होताना दिसत आहे. इतकेच नाही, तर यामुळे निर्मातेदेखील चित्रपटाच्या स्क्रीप्टवर अधिकाधिक लक्ष देत आहेत. या सर्वांचा परिणाम मराठी इंडस्ट्री नफ्यासोबतच यशाची पुढची पायरी चढण्यावर होणार आहे.
मराठीत वापरला जातोय प्रमोशनचा करेक्ट फंडा
गेल्या काही वर्षांपर्यंत मराठी चित्रपट प्रमोशन आणि मार्केटिंगशिवायच प्रदर्शित केले जात असत. याचा परिणाम संपूर्ण इंडस्ट्रीवर होताना पाहायला मिळत असे. पण, आता एका विशिष्ट स्ट्रक्चरमध्ये चित्रपटाचे प्रमोशन आणि त्याला प्रेक्षकांसमोर मांडले जाते. जे आजवर फक्त बॉलीवूडमध्ये होत असे. तसेच आता कलाकारांनाही प्रमोशन करणे गरजेचे असते, हे प्रकर्षाने जाणवू लागल्याने ते स्वत:चा वेळही प्रमोशनसाठी देत आहेत. उत्तम चित्रपट बनवणे आणि योग्य प्रेक्षकांपर्यंत योग्य पद्धतीने चित्रपट पोहोचवणे, हे दोन महत्त्वाचे फंडे असल्याचे सर्वांच्या लक्षात आले आहे. चित्रपट तयार होऊन प्रेक्षकांपर्यंत पोहोचेपर्यंत असंख्य जण मेहनत घेत असतात. अगदी स्पॉटबॉयपासून दिग्दर्शक, कलाकारांइतकीच महत्त्वाची भूमिका आता मार्केटिंगची झाली आहे. त्यासाठी वेगवेगळे फंडे मार्केटिंग कंपन्यांकडून वापरले जातात. याचे कारण आता केवळ टेलिव्हिजन किंवा सोशल मीडियावर चित्रपटाचे मार्केटिंग करणे पुरेसे नाहीये. त्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्यांचा वापर करावाच लागतो. मराठी चित्रपटांसाठी एकाच छताखाली या सर्व सुविधा पुरविणारी मार्केटिंग कंपनी म्हणजे, ग्लोबल स्पोटर््स एंटरटेनमेंट अँड मीडिया सोल्युशन्स (जीएसइएमएस). ही कंपनी चित्रपटासाठी आवश्यक असणाऱ्या टॅलेंट मॅनेजमेंट, प्रमोशन आणि प्रॉडक्शन या तीन महत्त्वाच्या भागांसाठी काम करते. आजवर या कंपनीने टॅलेंट मॅनेजमेंटमधून स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णीसारखे मातब्बर कलाकार आणि मितवा चित्रपटाच्या दिग्दर्शिका स्वप्ना जोशी आणि सतीश राजवाडेसारखे सुपरहिट दिग्दर्शक मराठी इंडस्ट्रीला दिले आहेत. तर, 20 पेक्षा जास्त मराठी चित्रपटांच्या प्रमोशनची धुरा या कंपनीने यशस्वीपणे सांभाळली आहे. यामध्ये मितवा, प्यारवाली लव्ह स्टोरी आणि नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘फ्रेंड्स’ चित्रपटाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. प्रमोशनबरोबरच ५ मालिकांची निर्मिती या कंपनीने केली आहे. अर्जुनसिंग बरान आणि कार्तिक निशानदार या कल्पक जोडीने मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख बनविली आहे. आपल्या कल्पकतेने चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचविला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील आपले अनुभव अर्जुनसिंग बरान आणि कार्तिक निशानदार ‘सेलीब्रिटी रिपोर्टर’ म्हणून ‘सीएनएक्स’शी शेअर करताहेत...

Web Title: Marathi industry is professional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.