'ही' ठरली सर्वोच्च महामालिका; टीआरपी स्पर्धेत मिळवलं 'नंबर वन' स्थान; वाचा TRP रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 01:17 PM2024-09-05T13:17:02+5:302024-09-05T13:17:58+5:30
सध्या 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील मालिका या शर्यतीत आघाडीवर आहेत.
छोट्या पडद्यावर TRP ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कोणती मालिका चांगली, कोणत्या मालिकेची प्रेक्षकसंख्या घटली TRP च्या आकड्यांवरुच स्पष्ट होतं. त्यामुळे TRP साठी वाहिन्यांमध्ये नेहमीच चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळतं. TRP रेसमध्ये पहिला क्रमांक गाठण्यासाठी मेकर्स नवनवीन ट्विस्ट आणत असतात. पण, काही वेळा ते यामध्ये यशस्वी होतात तर काही वेळा हा डाव फसतो आणि मालिकेचा टीआरपी खाली घसरतो.
दर आठवड्याला मालिकांच्या टीआरपीची यादी प्रसिद्धी केली जाते. सध्या 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील मालिका या शर्यतीत आघाडीवर आहेत. नुकत्याच समोर आलेल्या टीआरपी रिपोर्ट नुसार, सगळ्यात पहिल्या स्थानावर आहे 'ठरलं तर मग'. जुई गडकरींच्या मालिकेनं आपलं स्थान कायम ठेवलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. यामध्ये जुई गडकरी आणि अमित भानुशाली हे सायली आणि अर्जुनच्या भूमिकेत आहेत.
ईशा केसकर हिची 'लक्ष्मीच्या पावलांनी' ही मालिका दुसऱ्या स्थानावर आहे. 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेने तिसऱ्या स्थानावर बाजी मारली आहे. तर चौथ्या क्रमांकावर कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी' पाचवं पर्व तर पाचव्या क्रमांकावर 'थोडं तुझं थोडं माझं' या मालिकेन स्थान मिळवलंय. 'आई कुठे काय करते' मालिकेची 16 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. आता पुढच्या आठवड्यात या आकड्यांमध्ये कसा बदल होऊन कोणती मालिका वरचढ ठरणार हे पाहायचं आहे.