"मराठी मौनी रॉय..." अक्षयाच्या फोटोंवर चाहत्याची कमेंट; हटके पोज पाहून नेटकरी पडले प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 04:35 PM2024-09-14T16:35:30+5:302024-09-14T16:42:38+5:30

अभिनेत्री अक्षया हिंदळकर छोट्या पडद्यावरील 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेत मुख्य भूमिकेत काम करताना दिसते आहे.

अक्षया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

नवीन प्रोजेक्टबरोबरच अनेकदा ती तिचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

सध्या अक्षयाच्या लेटेस्ट फोटोंची नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. तिच्या हे व्हायरल फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.

अभिनेत्रीने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे साडीतील काही खास फोटो पोस्ट केले आहेत. आकाशी रंगाची साडी नेसून हटके पोज देत तिने हे फोटो क्लिक केलेत.

तिच्या फोटोंवर एका चाहत्याने "मराठी मौनी रॉय..."अशी कमेंट केली आहे.

अभिनेत्री अक्षया हिंदळकरने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'इश्काचा नादखुळा' मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती.

सध्या ती झी मराठीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.

'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत ती वसुंधरा नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे.