‘मराठी टायगर्स’वर बेळगावमध्ये बंदी
By Admin | Published: January 15, 2016 03:36 AM2016-01-15T03:36:46+5:302016-01-15T03:36:46+5:30
येळ्ळूरमध्ये २५ जुलै २०१४ रोजी पोलिसांनी मराठी भाषिकांवर केलेल्या अत्याचारावर आधारित ‘मराठी टायगर्स’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे, पण त्यावर बेळगावच्या जिल्हा प्रशासनाने
येळ्ळूरमध्ये २५ जुलै २०१४ रोजी पोलिसांनी
मराठी भाषिकांवर केलेल्या अत्याचारावर आधारित ‘मराठी टायगर्स’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे, पण त्यावर बेळगावच्या जिल्हा प्रशासनाने
बंदी घातली आहे. अमोल कोल्हे यामध्ये प्रमुख
भूमिका साकारत असून, फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रासह बेळगावातही हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. मात्र, पोलीस उपायुक्त अनुपम अगरवाल यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची बैठक घेऊन शहरातील शांततेला बाधा येईल, असे कोणतेही कृत्य केले जाऊ नये, अशी ताकीदच दिली आहे. सध्या ‘सोशल मीडिया’वर या चित्रपटाविषयी बरीच चर्चा सुरू आहे.
सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी कोणतंही मत प्रदर्शन करू नये, तसंच चित्रपट प्रदर्शित झाला, म्हणून आनंदोत्सव करून दुसऱ्या बाजूच्या भावना दुखवू नये, असं आवाहनही अनुपम अगरवाल यांनी केलं आहे. मराठी भाषिक गेल्या पाच दशकांहून अधिक काळ आपल्या न्याय मागणीसाठी शांततापूर्ण आंदोलन करीत आहेत. मराठी टायगर्स चित्रपट अद्याप प्रदर्शित झाला नाही. त्या चित्रपटात काय आहे याची माहितीही नाही, पण असं असतानाही जिल्हा प्रशासन आणि कन्नड नेते निष्कारण चित्रपटाचा मुद्दा वादाचा बनवत आहेत, अशी प्रतिक्रिया माजी महापौर आणि सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी व्यक्तकेली.