मराठी तितुका मेळवावा

By Admin | Published: January 21, 2015 11:37 PM2015-01-21T23:37:22+5:302015-01-21T23:37:22+5:30

खामोश’ या परवलीच्या शब्दाने प्रसिद्ध पावलेल्या शॉटगन शत्रुघ्न सिन्हाच्या मुलाच्या लग्नसमारंभातील हा बोलका क्षण.

Marathi Tituka Melvava | मराठी तितुका मेळवावा

मराठी तितुका मेळवावा

googlenewsNext

'खामोश’ या परवलीच्या शब्दाने प्रसिद्ध पावलेल्या शॉटगन शत्रुघ्न सिन्हाच्या मुलाच्या लग्नसमारंभातील हा बोलका क्षण... सुपरस्टार रजनिकांत आणि राज्यसभा सदस्य तसेच लोकमत मीडिया प्रा.लि.चे एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा यांच्या या भेटीतील संवाद सुरूच मुळी झाला अस्सल मराठीतून! काय शिवाजीराव, काय चाललंय, अशी विचारणा खा. दर्डा यांनी शिवाजीराव गायकवाड तथा रजनिकांत यांच्याकडे केली आणि प्रतिसादही मराठीतच मिळाला. नियमित
मराठीत बोलता की नाही, या खा. दर्डा यांच्या प्रश्नावर रजनिकांतकडून मिळालेले उत्तर सीमावादाच्या पलीकडचे होते... बोलतो पण कन्नडचा प्रभाव असलेले मराठी! मग त्यांच्यात रंगल्या त्या चंदेरी दुनियेतील गप्पा... रुपेरी पडद्यावरच्या आणि पडद्यामागीलही स्मृतिरंजन... अर्थात या गप्पांकडे पाहणाऱ्या उपस्थित मराठीजनांना स्वाभाविकपणे आठवले, ते 'लोकमत’चे ब्रीदवाक्य... जिथे मराठी तिथे लोकमत!

Web Title: Marathi Tituka Melvava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.