Video : दिवसा अभिनय अन् रात्री रिक्षा चालवते ही अभिनेत्री! बोमन इराणींनी म्हटले ‘रिअल हिरो’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 10:39 AM2019-05-05T10:39:42+5:302019-05-05T10:41:00+5:30

बॉलिवूड अभिनेते बोमन इराणी यांनी नुकताच आपल्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का असला.

marathi tv actress laxmi ride auto rickshaw as part time in night boman irani share video | Video : दिवसा अभिनय अन् रात्री रिक्षा चालवते ही अभिनेत्री! बोमन इराणींनी म्हटले ‘रिअल हिरो’!!

Video : दिवसा अभिनय अन् रात्री रिक्षा चालवते ही अभिनेत्री! बोमन इराणींनी म्हटले ‘रिअल हिरो’!!

googlenewsNext
ठळक मुद्देतूर्तास हा व्हिडीओ तुफान वेगाने व्हायरल होतोय.

बॉलिवूड अभिनेते बोमन इराणी यांनी नुकताच आपल्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का असला. होय, या व्हिडीओत बोमन एका ऑटो रिक्षातआहेत आणि एक महिला या ऑटो रिक्षाची चालक आहे. पण ही महिला साधीसुधी नाही तर अभिनेत्री आहे. वाटायला हा कुण्या चित्रपटातील प्रसंग वाटावा. पण तसे नाही. ही ‘लेडी ड्रायव्हर’ दिवसा अभिनय करते आणि रात्री पार्ट टाईम ऑटो रिक्षा चालवते.


या अभिनेत्रीचे नाव आहे लक्ष्मी. अनेक मराठी मालिकेत तिने काम केलेय. बोमन आपल्या गाडीतून प्रवास करत असताना एक ऑटोरिक्षा त्यांच्याजवळून जातो. या ऑटोतील दोन प्रवाशांची नजर बोमन यांच्याकडे जाते आणि ते बोमन यांना सेल्फीसाठी विनंती करतात. या दोन प्रवाशांना घेऊन जाणारी ऑटोरिक्षाची चालक लक्ष्मी ही सुद्धा बोमन यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त करते. बोमन त्वरित होकार देतात. लक्ष्मी ही अभिनेत्री आहे आणि दिवसा अभिनय करून रात्री रिक्षा चालवते, हे बोमन यांना कळते आणि ते जणू लक्ष्मीच्या प्रेमात पडतात. या व्हिडीओत ते लक्ष्मीची तोंडभरून स्तूती करतात. लक्ष्मी एक रिअल हिरो असल्याचे शिवाय तिचा अभिमान असल्याचे ते म्हणतात. तूर्तास हा व्हिडीओ तुफान वेगाने व्हायरल होतोय. हा व्हिडीओ तुम्हीही पाहा आणि कसा वाटला ते नक्की सांगा...

Web Title: marathi tv actress laxmi ride auto rickshaw as part time in night boman irani share video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.