Video:  'बिग बॉस'च्या घरात नवा स्पर्धक? सोनाली कुलकर्णीने घेतली एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 01:26 PM2021-11-16T13:26:12+5:302021-11-16T13:26:59+5:30

Sonalee kulkarni: कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये घरात चक्क अभिनेत्री सोनाली कुलकर्णी येत असल्याचं दिसून येत आहे.

 marathi tv show bigg boss marathi 3 actress sonalee kulkarni in bigg boss house | Video:  'बिग बॉस'च्या घरात नवा स्पर्धक? सोनाली कुलकर्णीने घेतली एन्ट्री

Video:  'बिग बॉस'च्या घरात नवा स्पर्धक? सोनाली कुलकर्णीने घेतली एन्ट्री

googlenewsNext

छोट्या पडद्यावर गाजत असलेला लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस मराठी (bigg boss marathi). सध्या या शोचं तिसरं पर्व सुरु असून या घरात सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाची आता स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. आतापर्यंत या घरात आदिश वैद्य (adish vaidya) आणि नीथा शेट्टी साळवी (nitha shetty -salvi) या दोन स्पर्धकांनी वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. मात्र, या दोघांचाही प्रवास अवघ्या काही आठवड्यांमध्ये संपला. त्यानंतर आता घरात पुन्हा एका नव्या सदस्याची एन्ट्री झाली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धकाच्या एन्ट्रीने घरात एकच गोंधळ उडाला आहे.

कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये घरात चक्क अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (sonalee kulkarni) येत असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे  या घरात सोनालीला पाहिल्यावर घरातील प्रत्येक स्पर्धक अचंबित झाला आहे. तर, सोनाली या पुढे या शोचा भाग असेल का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये सोनाली जरी बिग बॉसच्या घरात दिसत असली तरीदेखील ती या शोमध्ये सहभागी होण्यासाठी नव्हे तर तिच्या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आली आहे.

दरम्यान,  सोनाली लवकरच 'झिम्मा' या आगामी मराठी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत निर्मिती सावंत, मृण्मयी गोडबोले, सायली संजीव अशा लोकप्रिय अभिनेत्री झळकणार आहेत.
 

Web Title:  marathi tv show bigg boss marathi 3 actress sonalee kulkarni in bigg boss house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.