Bigg Boss Marathi: 'स्वत:ची चूक मान्य कर'; विकास- मिनलच्या मैत्रीला तडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 18:44 IST2021-10-26T18:44:25+5:302021-10-26T18:44:55+5:30
Bigg Boss Marathi: सध्या मिनल शहा आणि विकास पाटील यांच्या मैत्रीला तडा गेल्याचं दिसून येत आहे. 'स्वर्ग की नरक' या टास्कमुळे या दोघांमध्ये वाद झाले आहेत.

Bigg Boss Marathi: 'स्वत:ची चूक मान्य कर'; विकास- मिनलच्या मैत्रीला तडा
बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi) घरात कोणताही टास्क दिला की त्यात घरातील सदस्यांची भांडणं ही आलीच. कोणत्याही लहान सहान कारणावरुन हे स्पर्धक एकमेकांसोबत वाद घालत असतात. एरवी विरोधी गटासोबत वाद घालणारे स्पर्धक आता स्वत:च्याच मित्र-मैत्रिणींसोबत वाद घालताना दिसत आहे. यामध्ये सध्या मिनल शहा (meenal shah) आणि विकास पाटील (vikas patil) यांच्या मैत्रीला तडा गेल्याचं दिसून येत आहे. 'स्वर्ग की नरक' या टास्कमुळे या दोघांमध्ये वाद झाले आहेत.
अलिकडेच घरात स्वर्ग की नरक हे नॉमिनेशन कार्य पार पडलं. या कार्यामध्ये दादूस (santosh) टास्कचा निकाल देणार होते. त्यांच्यासोबत विशाल (vishal), स्नेहा(sneha) आणि गायत्री (gayatri) हे तीन सल्लागारही दिले होते. या चौघांनी मिळून कोणत्या सदस्याला नरकात टाकायचं आणि कोणाला स्वर्गात हे ठरवलं. यावेळी विशालने विकासच्या विरोधात जात त्याला नरकात टाकल्यामुळे विकास चांगलाच संतापला. केवळ इतकंच नाही तर या दोघांमधील गैरसमज दूर करण्यासाठी आलेल्या मिनललादेखील त्याने खडेबोल सुनावले.
'जे झालं ते चांगलंच झालं'; स्नेहासोबतच्या नात्यावर आविष्कार पहिल्यांदाच व्यक्त
विशालने जो निर्णय दिला तो बालिशपणाचा होता. मुद्दाम माझ्याविरोधात मुद्दे शोधून काढले असं विकासचं मत होतं. तसंच विशालकडून ही अपेक्षा नव्हती असंही तो म्हणाला. यावर मिनल आणि विशालने त्याची समजूत काढायचा प्रयत्न केला.
'मला माझं मत मांडायचं होतं विकास', असं विशाल म्हणाला. त्यावर "त्या गायत्रीने माझी बाजू घेतली मग ती माझ्यासाठी जास्त चांगली आहे", असं प्रत्युत्तर विकासने दिलं. विकासचं हे वाक्य ऐकल्यानंतर "जर तुला तीचं मत योग्य वाटत असेल तर तसं समज", असं विशाल, मिनल म्हणाले.
"तुम्ही माझ्या विरोधात बोलत आहात. विशाल तू विरोधात नाहीस. पण तू मुद्दाम माझ्या विरोधात मुद्दे तयार केले आणि बोललास. तू हे आधीच ठरवलं होतं", असं विकास म्हणाला. यावर "तुझा आमच्यावर विश्वास नाही हे तू सिद्ध केलंस", असं मिनल, विशाल म्हणाले. त्यावर विकास म्हणाला, "मीनल मी तुझ्या विरोधात कधीच काही बोलो नाही, तू माझ्या विरोधात बोलीस, कधीतरी अॅक्सेप्ट कर. तू स्वत:ची चूक मान्य कर."
दरम्यान, बिग बॉस सुरु झाल्यापासून मिनल, विशाल आणि विकास या तिघांची छान गट्टी जमल्याचं सगळ्यांनीच पाहिलं होतं. मात्र, आता या टास्कमुळे या तिघांच्या मैत्रीत फूट पडते की काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.