मराठीत इंडस्ट्रीत गटबाजी कोणी सुरु केली माहितीये? सविता मालपेकरांनी थेट नावच घेतलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 04:32 PM2024-11-14T16:32:33+5:302024-11-14T16:34:08+5:30
सविता मालपेकर म्हणाल्या, "मी नाव घ्यायला घाबरत नाही. मला काय घेणं देणं आहे?"
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar) सध्या चर्चेत आहेत. नुकतंच काही माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये त्यांनी मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांची पोलखोल केली आहे. काशीनाथ घाणेकर, रंजना ते किरण माने अशा अनेक कलाकारांबाबतीत त्या बोलल्या आहेत. शिवाय एका प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाचं नाव घेत त्यांनी त्याच्यावर गटबाजीचा आरोप केला आहे. कोण आहे तो दिग्दर्शक?
सविता मालपेकर यांचं व्यक्तिमत्व म्हणजे अगदी रोखठोक. नुकत्याच काही मुलाखतींमध्ये त्या अशाच रोखठोक अंदाजात बोलल्या आहेत. कॉकटेल स्टुडिओला दिलेल्या मुलाखतीत सविता मालपेकर म्हणाल्या, " मराठी इंडस्ट्रीत सर्वात आधी ग्रुपिझम कोणी आणलं असेल माहितीये का? चंद्रकांत कुलकर्णी. मी नावं घेऊन बोलेन. मी कोणाला घाबरत नाही. मला काय घेणं देणं आहे?"
याआधीही काही कलाकारांनी चंद्रकांत कुलकर्णींचं नाव घेत गटबाजीचा आरोप केला होता. आता सविता मालपेकर यांच्या खुलाश्याने पुन्हा मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीचा मुद्दा चर्चेत आला.
सविता मालपेकर बऱ्याच वर्षांपासून मराठी सिनेसृष्टीत आहेत. काशिनाथ घाणेकर, अशोक सराफ पासून ते आताच्या नवोदित कलाकारांसोबत त्यांनी काम केले आहे. 'काकस्पर्श', 'गाढवाचं लग्न' अशा अनेक सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे.