सोज्वळ वाटणारी ही मराठमोळी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे बोल्ड अँड बिनधास्त; शिव्या देण्याविषयी म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 14:31 IST2023-06-13T14:31:23+5:302023-06-13T14:31:52+5:30
Rujuta deshmukh: पडद्यावर साधी वाटणारी ही अभिनेत्री पडद्यामागे खऱ्या आयुष्यात चांगल्याच बोल्ड आणि बिनधास्त विचारांची आहे.

सोज्वळ वाटणारी ही मराठमोळी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे बोल्ड अँड बिनधास्त; शिव्या देण्याविषयी म्हणते...
छोट्या पडद्यावर एकेकाळी तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'कळत नकळत'. या मालिकेच्या उत्तम कथानकासह त्याचं टायटल सॉन्गही तितकंच गाजलं होतं. आजही हे टायटल साँग लोकांच्या ओठी ऐकायला मिळतं. या मालिकेत अभिनेत्री ऋजुता देशमुख (Rujuta deshmukh) हिने मुख्य भूमिका साकारली होती. सध्या ऋजुता '३६ गुणी जोडी' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. अलिकडेच तिने 'लोकमत फिल्मी'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने खऱ्या आयुष्यात आपण बिनधास्त असल्याचं सांगितलं.
मराठी कलाविश्वातील सोज्वळ, सालस आणि गुणी अभिनेत्री म्हणून ऋतुजाकडे पाहिलं जातं. आजवरच्या कारकिर्दीमध्ये ऋतुजाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. परंतु, पडद्यावर साधी वाटणारी ही अभिनेत्री पडद्यामागे खऱ्या आयुष्यात चांगल्याच बोल्ड आणि बिनधास्त विचारांची आहे. मी दिसते तितकी साधी, सोज्वळ नाही, असं तिने या मुलाखतीत सांगितलं.
कुठे गायब झाली 'कळत नकळत'फेम ऋजुता देशमुख; आता करतीये 'हे' काम
'मी जितकी साधी आणि सोज्वळ दिसते तितकी मी नाहीये. त्यामुळे हो मी अधूनमधून शिव्या देते', असं ऋतुजाने सांगितलं. दरम्यान, कळत नकळत या मालिकेसह ऋजुता रंग माझा वेगळा, 'जाऊ नको दूर बाबा', राजा शिवछत्रपती', 'आभाळमाया', 'तू माझा सांगाती' , 'स्वप्नांच्या पालिकडले' ,'आनंदी हे जग सारे' या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच ती 'रायगडाला जेव्हा जग येते' या नाटकामध्येही झळकली आहे. सध्या ती ३६ गुणी जोडी या मालिकेत अमुल्याच्या आईची भूमिका साकारत आहे.