मराठमोळी ही अभिनेत्री कार विकून चालवते रिक्षा, सेटवर लोक मारायचे टोमणे 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 06:52 PM2020-07-27T18:52:31+5:302020-07-27T18:53:50+5:30

मराठमोळी ही अभिनेत्री स्वतः रिक्षा चालवून शूटिंग सेटवर येते, हे ऐकल्यावर तुम्हाला जरा नवल वाटेल. पण हे खरे आहे.

Marathmoli is an actress who sells cars and drives rickshaws | मराठमोळी ही अभिनेत्री कार विकून चालवते रिक्षा, सेटवर लोक मारायचे टोमणे 

मराठमोळी ही अभिनेत्री कार विकून चालवते रिक्षा, सेटवर लोक मारायचे टोमणे 

googlenewsNext

मराठमोळी ही अभिनेत्री स्वतः रिक्षा चालवून शूटिंग सेटवर येते, हे ऐकल्यावर तुम्हाला जरा नवल वाटेल. पण हे खरे आहे. मराठमोळी अभिनेत्री यशश्री मसुरकर असे या अभिनेत्रीचे नाव आहे. तिने बऱ्याच मराठी व हिंदी मालिकेत काम केले आहे. स्वप्नील जोशी अभिनीत लाल इश्क सिनेमात ती झळकली होती. 

अभिनेत्री यशश्री मसुरकर हिने सिनेइंडस्ट्रीत यशाच्या शिखरावर असताना आपली कार विकून चक्क रिक्षा खरेदी केली होती. ती एवढ्यावरच थांबली नाही तर स्वतः रिक्षा चालवून ती शूटिंगला पोहोचू लागली. यावरून तिच्या सह कलाकारांनी तिची खिल्ली उडवली. परंतु या सर्व गोष्टींचा तिच्यावर कोणताच परिणाम झाला नाही.

याबाबत तिने सांगितले की, मी कार विकून रिक्षा घेण्यामागे एक खास कारण होते. तिचा परदेशातला एक मित्र भारतात फिरायला आला होता त्यामुळे तिने आपली कार विकून रिक्षा खरेदी केली होती. त्यानंतर या रिक्षाचे काय करायचे म्हणून तिनेच ही रिक्षा स्वतः वापरण्याचे ठरवले. यामुळे माझा वेळ आणि पैसा दोन्हीतही बचत होते. 

ड्रायव्हर ठेवणे त्याला पगार देणे शिवाय त्याने सुट्टी घेतल्यावर येणारी अडचण या बाजू लक्षात घेऊन तिनेच ती रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. यामुळे तिला समाजातील गोर गरीब लोकांमध्ये वावर ही वाढला. लहान गोर गरीब मुलांसोबत ती अनेकदा फिरताना पाहायला मिळते इतकेच काय तर मुलांना शाळेत देखील सोडते. कदाचित कार असती तर तिला असे जगता आले नसते ह्यात एक वेगळाच आनंद आहे असे ती म्हणते. तिच्या याच कामगिरीमुळे सोशल मीडियावर सध्या ती चांगलीच चर्चेत येऊ लागली आहे.

यशश्री मसुरकरने रंग बदलती ओढणी, चक्रवर्ती अशोक सम्राट, दो दिल बंधे एक डोरी से, आरंभ यासारख्या मालिकेत काम केले आहे. यशश्री आरजेसुद्धा आहे.   

Web Title: Marathmoli is an actress who sells cars and drives rickshaws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.