चुरशीच्या लढतीत शाहरूखचीच सरशी

By Admin | Published: November 18, 2015 12:58 AM2015-11-18T00:58:44+5:302015-11-18T00:58:44+5:30

बॉ लिवूड आणि प्रेक्षकांचे लक्ष आहे ते डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या दोन मोठ्या चित्रपटांच्या सामन्याकडे. २००७मध्ये ‘ओम शांती ओम’ विरुद्ध ‘सांवरिया’नंतर

In the match of the match, | चुरशीच्या लढतीत शाहरूखचीच सरशी

चुरशीच्या लढतीत शाहरूखचीच सरशी

googlenewsNext

बॉ लिवूड आणि प्रेक्षकांचे लक्ष आहे ते डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या दोन मोठ्या चित्रपटांच्या सामन्याकडे. २००७मध्ये ‘ओम शांती ओम’ विरुद्ध ‘सांवरिया’नंतर पुन्हा एकदा शाहरूख खान आणि संजय लीला भंसाळी यांचे चित्रपट समोरासमोरा येत आहेत.
शाहरूख खानचा ‘दिलवाले’ आणि भंसाळीचा ‘बाजीराव मस्तानी’ या दोघांमध्ये दर्शक कोणत्या चित्रपटाला जास्त पसंती देणार हे तर ते सिनेमे प्रदर्शित झाल्यानंतरच समजेल. पण ही लढत चुरशीची होणार हे नक्की. मात्र अशा चुरशीच्या लढतीत अनेकदा शाहरूखच भारी पडला आहे.
बॉक्स आॅफिसवर बादशाही गाजवणाऱ्या शाहरूख खानने आपल्या कारकिर्दीत अशा कित्येक स्पर्धा अनुभवल्या आहेत. विशेषत: दिवाळीच्या काळात शाहरूख खानच्या चित्रपटांना दुसऱ्या मोठ्या चित्रपटांचा सामना करावा लागला आहे. मात्र दिवाळी नेहमी
शाहरूख खानला भाग्याची ठरली आहे. असाच सामना २०१२मध्ये ‘जब तक
है जान’सोबत अजय देवगनच्या ‘सन
आॅफ सरदार’ या चित्रपटाशी झाला
होता. त्या वेळी दोन्ही चित्रपटांनी १०० कोटींच्या कमाई करणाऱ्या क्लबमध्ये
जागा बनविली होती; पण चर्चा झाली ती ‘जब तक है जान’चीच. याचप्रमाणे
२००४मध्ये ‘वीर-झरा’च्या बरोबरीत अब्बास मस्तानचा ‘ऐतराज’ प्रदर्शित
झाला. त्या वेळीही शाहरूखनेच बाजी मारली. तसेच ‘कुछ कु छ होता है’च्या विरुद्ध डेविड धवनचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट आला होता. पण, ‘कुछ कुछ होता है’ हा सिनेमाच प्रेक्षकांच्या लक्षात राहिला.
‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या समोर ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई अगेन’चे आव्हान होते. पण, अक्षय कुमार आणि इमरान खानसोबत सोनाक्षी सिन्हा यांचा हा चित्रपट चेन्नई एक्स्प्रेसच्या गतीला पार करू शकला नाही. २००६मधील ‘डॉन’ या शाहरूख खानच्या चित्रपटाचा सामना सलमान खान आणि अक्षय कुमारचा ‘जानेमन’ करू शकला नाही. २०००मध्ये आलेल्या ‘मोहब्बते’च्या सामन्यात विधू विनोद चोपडाचा ‘मिशन कश्मीर’ फिका ठरला.
पुढच्या वर्षी शाहरूखचा ‘रईस’ आणि सलमानचा ‘सुलतान’ या चित्रपटांमध्ये ऐन ईदच्या धामधुमीत सामना रंगणार आहे.

-  anuj.alankar@lokmat.com

Web Title: In the match of the match,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.