माझ्या नवऱ्याची बायको फेम शर्मिला राजाराम आपल्या या सहकलाकारासोबत झाली परदेशी रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 11:07 AM2018-10-25T11:07:21+5:302018-10-25T11:12:33+5:30

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी जेनी म्हणजेच शर्मिला राजाराम नुकतीच काही दिवसांसाठी परदेशवारीसाठी गेली आहे. शर्मिला परदेशात एकटी नव्हे तर तिच्या एका लाडक्या मैत्रिणीसोबत गेली आहे.

Mazya Navryachi Bayko fame Sharmila Rajaram and Mere Sai fame Toral Rasputra enjoying in Amsterdam | माझ्या नवऱ्याची बायको फेम शर्मिला राजाराम आपल्या या सहकलाकारासोबत झाली परदेशी रवाना

माझ्या नवऱ्याची बायको फेम शर्मिला राजाराम आपल्या या सहकलाकारासोबत झाली परदेशी रवाना

googlenewsNext

माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेत शर्मिला राजाराम जेनी ही भूमिका साकारत आहे. प्रेक्षकांना ही जेनी खूपच आवडते. पण जेनीला प्रेक्षकांना काही दिवस मालिकेत पाहायला मिळणार नाहीये. कारण प्रेक्षकांची लाडकी जेनी नुकतीच काही दिवसांसाठी परदेशवारीसाठी गेली आहे. शर्मिला परदेशात एकटी नव्हे तर तिच्या एका लाडक्या मैत्रिणीसोबत गेली आहे. ही मैत्रीण दुसरी कोणीही नसून तिच्या एका मालिकेतील सहकलाकार आहे.

शर्मिला राजाराम माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेसोबतच मेरे साई या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या मालिकेत ती चिऊ बाई या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. याच मालिकेत बायजीची भूमिका साकारणाऱ्या तोरल रासपुत्रसोबत ती परदेशात फिरायला गेलेली आहे.

टेलिव्हिजनवर दररोज प्रसारित होणार्‍या मालिकेत काम करणार्‍या कलाकारांच्या बाबतीत असे बर्‍याचदा घडते की, ते सेटवर आपल्या सह-कलाकारांसोबत खूप जास्त वेळ व्यतीत करतात. सोनी टीव्हीवरील मेरे साई मालिकेत बायजाची भूमिका करणारी तोरल रासपुत्र आणि चिऊताईची भूमिका करणारी शर्मिला राजाराम सध्या परदेश प्रवासाला गेल्या आहेत. अलीकडेच साई बाबांच्या पुन्हा अवतरित होण्याच्या प्रसंगाचे चित्रण करण्यासाठी नवे जुने सर्व कलाकार एकत्र आले होते. सर्वांचे एकत्र प्रदीर्घ चित्रीकरण करून झाल्यानंतर मेरे साईची बायजा आणि चिऊ ताई म्हणजे तोरल आणि शर्मिला या दोघी जणी परदेश प्रवासाला निघून गेल्या आहेत. या दोन्ही अभिनेत्री सध्या अॅमस्टरडॅमच्या रस्त्यांवर भटकंतीचा आनंद लुटत आहेत. दोघींनी सोशल मीडियावर आपले फोटो टाकले आहेत ते पाहून त्यांच्यातील मैत्री किती घट्ट आहे, ते जाणवते.

मेरे साईच्या सेटवर देखील या दोघी जणी अधिकाधिक वेळ एकत्रच घालवतात. विश्रांतीच्या वेळेत दोघी जणी आपल्या टीमसोबत एकत्र जेवतात. या परदेश दौर्‍याबाबत त्या खूप उत्साहित आहेत. विविध पदार्थांचा आस्वाद त्या तिथे घेत आहेत.

 


 


 

Web Title: Mazya Navryachi Bayko fame Sharmila Rajaram and Mere Sai fame Toral Rasputra enjoying in Amsterdam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.