Meenakshi Sheshadri : मिनाक्षी शेषाद्रीच्या मुलासमोर फेल आहेत बॉलिवूडचे स्टारकिड्स, ‘दामिनी’ची लेक सुद्धा दिसते भारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 11:43 AM2022-06-02T11:43:38+5:302022-06-02T11:44:12+5:30
Meenakshi Sheshadri : मिनाक्षीने 1995 साली अमेरिकेत राहणारा इनव्हेस्टमेंट बँकर हरीश मैसूरसोबत लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत. मिनाक्षीच्या मुलीचं नाव केंद्रा आहे. तर मुलाचं नाव जोश आहे.
80 व 90 च्या दशकात प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे मिनाक्षी शेषाद्री (Meenakshi Sheshadri) . दामिनी, हिरो, घातक असे सुपरहिट सिनेमे देणाºया मिनाक्षीनं स्वबळावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शक व अभिनेत्यांसोबत तिने काम केलं. त्या काळातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाऊ लागली. पण नाव, प्रसिद्धी, पैसा असं सगळं काही असताना मिनाक्षीने एकाएकी सिनेसृष्टीला रामराम ठोकला.
केवळ बॉलिवूडच नाही तर देश सोडून ती परदेशात स्थायिक झाली. मिनाक्षीचा दामिनी हा सिनेमा तुफान गाजला. आजही चाहते तिला दामिनी याच नावाने ओळखतात. याच दामिनीच्या आयुष्याबद्दल जाणण्यास चाहते आजही उत्सुक आहेत. आज आम्ही दामिनीच्या मुलांचे फोटो तुम्हाला दाखवणार आहोत.
मिनाक्षीने 1995 साली अमेरिकेत राहणारा इनव्हेस्टमेंट बँकर हरीश मैसूरसोबत लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत. मिनाक्षीच्या मुलीचं नाव केंद्रा आहे. तर मुलाचं नाव जोश (Josh Mysore) आहे. केंद्रा व जोश आता बरेच मोठे झाले आहेत.
मिनाक्षीची मुलगी केंद्रा (Kendra Mysore ) चांगलीच ग्लॅमरस आहे. तिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात केंद्रा क्यूट स्माईल देताना दिसतेय. केंद्राचा फोटो चाहत्यांना भलताच आवडला आहे. अनेक सोशल मीडिया युजर्स केंद्राच्या सौंदर्यावर फिदा झाले आहेत. आत्तापर्यंत तू कुठे होतीस, तुझ्यासमोर तर सगळ्या हिरोईन फेल आहेत,अशा कमेंट्स अनेक युजर्सनी केल्या आहेत.
मुलगा जोश हा सुद्धा हँडसम, गुड लुकिंग व कूल आहे. जोशचा फोटो पाहून तो बॉलिवूडच्या स्टारकिड्सला जोरदार टक्कर देईल, असं मानलं जातंय. एकदा मिनाक्षीने जोशचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
गेल्या काही वर्षांत मिनाक्षी कमालीची बदलली आहे. इतकी की, तिला ओळखणंही कठीण आहे. मिनाक्षीने फिल्म इंडस्ट्रीला जरी रामराम ठोकला असला तरीदेखील ती आपली नृत्याची आवड जोपासत आहे. टेक्सासमध्ये स्थायिक झालेल्या मिनाक्षीने तेथे कथ्थक अकादमी उघडली असून तरुणींना नृत्याचे धडे देते.