माझ्या भावांना कोरोनाने नाही तर अपयशी आरोग्य यंत्रणेने मारले...! अभिनेत्री मीरा चोप्रा संतापली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 12:49 PM2021-05-10T12:49:49+5:302021-05-10T12:51:51+5:30
गेल्या 10 दिवसांत प्रियंका चोप्राची चुलत बहीण मीरा चोप्राने आपल्या कुटुंबातील दोन सदस्यांना गमावले. या दोन सदस्यांच्या मृत्यूसाठी मीराने सरकारला जबाबदार ठरवले आहे
प्रियंका चोप्राची चुलत बहीण मीरा चोप्रा (Meera Chopra) हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलाये. गेल्या 10 दिवसांत मीराने आपल्या कुटुंबातील दोन सदस्यांना गमावले. आता दोन सदस्यांच्या या मृत्यूसाठी मीराने सरकारला जबाबदार ठरवले आहे, माझ्या कुटुंबातील लोकांना कोरोना व्हायरसने नाही तर या देशातील कमकुवत आरोग्य व्यवस्थेने मारले, अशा शब्दांत तिने आपला संताप व्यक्त केला आहे.
अलीकडे कोरोनामुळे मीराच्या जवळच्या दोन कझिनचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूने दु:खी मीराने यासाठी सरकारला दोषी ठरवले. एक ट्विट करत तिने आपला संताप व्यक्त केला. (Meera Chopra: My cousins didn’t die of Covid, but lack of medical infrastructure)
This is heartbreaking. Something ive been saying it, these are not covid deaths, these are murders by our failed infrastructure. The only country where people are dying bcoz there is no oxygen. Appalling!!!!#COVID19India#RahulVohrahttps://t.co/RZwuoS9xZ0
— meera chopra (@MeerraChopra) May 9, 2021
‘हे वेदनादायी आहे. पण हे कोव्हिडचे बळी नाही तर अपयशी ठरलेल्या यंत्रणेने केलेल्या हत्या आहेत. भारत एकमेव असा देश आहेत, जिथे ऑक्सिजन नाही म्हणून लोक मरत आहेत,’ असे ट्विट तिने केले.
माझ्या एका भावाला दोन दिवस आयसीयू बेड मिळाला नाही...
एका मुलाखतीतही तिने आपला संताप व्यक्त केला. माझ्या पहिल्या चुलत भावाला दोन दिवसांपर्यंत बेंगळुरात आयसीयू बेड मिळाला नाही आणि दुस-या चुलत भावाचा ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने मृत्यू झाला. त्या दोघांचेही वय 40 पेक्षा जास्त नव्हते. आम्ही त्यांना वाचवण्यासाठी काहीही करू शकलो नाही, हे खूप दु:खद आणि वेदनादायी आहे. पुढे आणखी काय होईल, ही भीती मनात घर करून बसली आहे. आयुष्य हातातून निसटू पाहत आहेत आणि पहिल्यांदा मला प्रचंड संताप येतोय. आपला देश खड्ड्यात गेलाय, असे मला वाटतेय. आम्हाला आॅक्सिजन, बेड्स, इंजेक्शन हवे होते. हे पुरवण्याचे काम सरकारने करायला हवे होते. पण सरकार अपयशी ठरले. लॉकडाऊन लावल्यानंतर मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याची गरज होती. पण काहीही झाले नाही आणि परिणामी कोव्हिडची दुसरी लाट आली, अशा शब्दांत तिने आपली नाराजी बोलून दाखवली.