बॉलिवूडमध्ये रुपेरी पडद्यावर झळकण्याआधी ऑफस्क्रीन काम केलंय या कलाकारांनी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 07:15 AM2019-07-14T07:15:00+5:302019-07-14T07:15:00+5:30
रुपेरी पडद्यावर काम करण्यापूर्वी बारकावे जाणून घेण्यासाठी या कलाकारांनी पडद्याच्या मागे काम करून बॉलिवूडमधील आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली आहे.
रुपेरी पडद्यावर काम करण्यापूर्वी बारकावे जाणून घेण्यासाठी या कलाकारांनी पडद्याच्या मागे काम करून बॉलिवूडमधील आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली आहे. असे बॉलिवूडमधील बरेच कलाकार आहेत ज्यांनी बऱ्याच चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका बजावली आहे.
शर्मिन सहगल
शर्मिन सहगलने लॉस अँजल्सच्या ली स्ट्रासबर्ग थिएटर अँड फिल्म इंस्टिट्युटमधून अभिनयात डिग्री घेतल्यानंतर शर्मिन सहगलने मेरी कॉम व बाजीराव मस्तानी सारख्या चित्रपटाचे सहायक दिग्दर्शन केले. आता मलाल चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा रोमँटिक ड्रामावर आधारीत असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.
वर्धन पुरी
शिवालिका ऑबेरॉयसोबत पागल चित्रपट साईन करण्यापूर्वी वर्धन पुरी याने बऱ्याच सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शन केलं आहे इश्कजादे आणि दावत-ए-इश्कपासून शुद्ध देसी रोमांस चित्रपटापर्यंत वर्धनने वायआरएफ, हबीब फैजल व मनीष शर्मा यांच्यासोबत काम केलं आहे.
करण देओल
सनी देओलचा मुलगा करण देओल याने अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी निर्मिती प्रक्रिया, सेटवरील अॅक्शन आणि दिग्दर्शनातील बारकावे समजून घेतले आहेत. त्याने यमला पगला दीवानामध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. साहिर बंबासोबत त्याने पल पल दिल के पास चित्रपटात अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.
मीजान जाफरी
मीजान जाफरी याने मलाल चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याने न्यूयॉर्कमधून अभिनयाचे धडे गिरविल्यानंतर संजय लीला भन्साळी यांच्या ऐतिहासिक चित्रपट पद्मावतमध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं. मीजान एक प्रशिक्षित डान्सर व मार्शट आर्ट विशेषतज्ज्ञ आहे.
शिवालिका ऑबेरॉय
दिग्दर्शक साजिद नाडियादवाला यांच्यासोबत किक व हाऊसफुल ३ चित्रपटात काम करून शिवालिकाने निर्मिती क्षेत्रातील बारकावे शिकली आणि आता पहिला चित्रपट पागलमधून अभिनय क्षेत्रात आपले कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. हा रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे. यात तिच्यासोबत वर्धन पुरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.