'या' कारणासाठी मेघानाने घेतली लंडनमधील डॉक्टरांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 06:30 AM2019-01-12T06:30:00+5:302019-01-12T06:30:00+5:30
‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या मेघा चक्रबोर्तीची भूमिका प्रेक्षकांना भावतेय. लंडनमधून डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मालिकेत कृष्णा कठोर मेहनत घेतेय.
‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या मेघा चक्रबोर्तीची भूमिका प्रेक्षकांना भावतेय. लंडनमधून डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मालिकेत कृष्णा कठोर मेहनत घेतेय. यासाठी लंडनमधील काही डॉक्टरांची भेट घेऊन त्यांच्या व्यवसायातील अनेक गोष्टी जाणून घेतल्या.
सूत्रांच्या माहितीनुसार “डॉक्टरची भूमिका वास्तवादी वाटावी म्हणून त्या व्यवसायातील काही तांत्रिक बाबी लक्षात घेण्याची गरज असते. आपली डॉक्टरची व्यक्तिरेखा विश्वासार्ह आणि नैसर्गिक कशी राहील, यासाठी मेघानेही काही प्रयत्न केले. तिने आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून लंडनमधील काही स्थानिक रुग्णालयांतील डॉक्टरांची भेट घेतली. त्यांच्या व्यवसायातील काही बाबी जाणून घेण्याबरोबरच डॉक्टरांची देहबोली कशी असते, त्यांचे वागणे-बोलणे यांचेही तिने निरीक्षण केले. आपली भूमिका अचूकतेने उभी करण्यासाठी कठोर मेहनत घेणाऱ्या कलाकारांपैकी ती एक आहे.”
राधे हा कानपूरमध्ये राहणारा २१ वर्षांचा देखणा तरुण असून त्याच्या वयाच्या अन्य मुलांची स्वप्ने लक्षावधी रुपये कमावणे, चांगल्या कंपनीत नोकरी करणे किंवा मित्रांबरोबर पार्टी करणे अशी असतात. पण राधेचे स्वप्न या वयातील इतर मुलांपेक्षा खूपच वेगळे आहे. या मालिकेची कथा ही आजच्या इतर मालिकांपेक्षा वेगळी असल्याने ती प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे.